scorecardresearch

Premium

विसर्जनादरम्यान विरार पारोळ येथील गणेश भक्ताचा बुडून मृत्यू

संजय हरीचंद्र पाटील (४५) असे या गणेशभक्ताचे नाव आहे.

Sanjay Patil died drowned ganesha idol immersion virar parol
विसर्जनादरम्यान विरार पारोळ येथील गणेश भक्ताचा बुडून मृत्यू (छायाचित्र- लोकसत्ता टीम)

लोकसत्ता प्रतिनिधी

वसई: विरार पूर्वेच्या पारोळ परिसरात नदीवर बुधवारी सायंकाळी दीड दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन करताना एका गणेशभक्ताचा बुडून मृत्यू झाला आहे. संजय हरीचंद्र पाटील (४५) असे या गणेशभक्ताचे नाव आहे.

napur miracle on anant chaturdashi, ganesh came out from coconut, ganesh idol from coconut
अनंत चतुर्दशीला चक्क नारळातून निघाले गणपती, भक्ताच्या घरी दाखवला चमत्कार
srimant dagdusheth halwai ganpati visarjan, ganesh visarjan pune
Pune Ganpati Visarjan 2023 Live : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मार्गस्थ
three farm laborers die car collision Ale Fata area, Pune Two laborers injured
पुणे: आळे फाटा परिसरात मोटारीच्या धडकेने तीन शेतमजुरांचा मृत्यू; दोघांची प्रकृती चिंताजनक
Navi Mumbai Municipal Commissioner Rajesh Narvekar went to the reservoir for ganesh immersion
नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर स्वतः तराफ्यावरून जलाशयात उतरले, स्वयंसेवकांचा उत्साह द्विगुणित

बुधवारी वसई विरार शहरात विविध ठिकाणी दीड दिवसांच्या बाप्पाला भक्ती भावाने निरोप देण्यात आला. पारोळ येथे राहणारे संजय पाटील हे सुद्धा पारोळ – शीरवली पुलाजवळील विसर्जन घाटावर गणपती विसर्जनासाठी गेले होते. याच गणेशमूर्तीचे विसर्जन करताना पाण्यात पडून प्रवाहात वाहून गेले. या घटनेची माहिती मांडवी पोलिसांना मिळताच घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दल व स्थानिक रहिवासी यांच्या मदतीने संजय यांचा शोध सुरू होता.

हेही वाचा… वसईत किरकोळ कारणावरून गायकाची हत्या; वाहनचालकास अटक

सात ते आठ तासानंतर रात्री उशिरा संजय यांचा मृतदेह नदीत सापडला असल्याची माहिती मांडवी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रफुल्ल वाघ यांनी दिली. याप्रकरणी मांडवी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. विसर्जनादरम्यान घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे विरार पूर्वेच्या ग्रामीण भागातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sanjay patil died due to drowned during ganesha idol immersion in virar dvr

First published on: 21-09-2023 at 10:38 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×