वसई : विरारमधील मांडवी पोलीस ठाण्यामध्ये महिलांसाठी स्वतंत्र पोलीस कोठडी तयार केली जाणार आहे. आतापर्यंत केवळ वसई पोलीस ठाण्यात महिलांसाठी एकमेव पोलीस कोठडी होती. त्यामुळे महिला कैद्यांना कोठडीत ठेवण्यासाठी तसेच कोर्टात नेण्यासाठी  पोलिसांना मोठी कसरत करावी लागत होती.

वसई, विरार शहरात एकूण दोन पोलीस परिमंडळ असून दहा पोलीस ठाणे आहेत. त्यामध्ये वसई, माणिकपूर, वालीव नालासोपारा, तुळींज, अर्नाळा सागरी आणि विरार या पोलीस ठाण्यांचा समावेश होता. यावर्षी मांडवी, पेल्हार आणि आचोळे  या तीन नव्या पोलीस ठाण्याची निर्मिती झाली होती. मात्र यापैकी वसई पोलीस ठाणे वगळता कुठल्याही पोलीस ठाण्यामध्ये महिला पोलिसांसाठी स्वतंत्र पोलीस कोठडी नव्हती.  वसई हे सर्वात जुने पोलीस ठाणे आहे. केवळ याच पोलीस ठाण्यामध्ये महिलांसाठी स्वतंत्र पोलीस कोठडीची सुविधा आहे. त्यामुळे इतर पोलीस ठाण्यांतील महिला कैद्यांना ठेवण्यासाठी त्यांना वसई पोलीस ठाण्यामध्ये आणावे लागते. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये पोलिसांचा वेळ खर्च जातो आणि मनस्ताप सहन करावा लागत होता. त्यामुळे नव्याने तयार झालेल्या मांडवी पोलीस ठाण्यामध्ये पुरुष आणि महिला कैद्यांसाठी स्वतंत्र पोलीस कोठडी तयार केली जात आहे. या पोलीस कोठडीचा फायदा मांडवीसह विरार, पेल्हार आणि आचोळे या तीन पोलीस ठाण्यांना होणार आहे.

mira road, Seize 1 thousand 500 kg of Beef, seize beef in mira road, mira road beef, cow guards, gau rakshak, police, beef news, mira road news, marathi news,
मिरा रोड येथे दीड हजार किलो गोमांस जप्त
Slum Improvement Board, contract,
मुंबई : झोपडपट्टी सुधार मंडळातील ‘कंत्राटा’साठी गोळीबार!
Versova Koliwada, facilities Versova koliwada,
वर्सोवा कोळीवाड्याला सोयी-सुविधांची प्रतीक्षा
Slum cleaning contract
झोपडपट्टी स्वच्छता कंत्राट : चौथ्यांदा मुदतवाढीची नामुष्की, १५ एप्रिलला न्यायालयात सुनावणी

नव्याने तयार झालेल्या मांडवी पोलीस ठाण्यामध्ये पोलिसांची कोठडी नव्हती. आता पोलीस कोठडी तयार करण्यात येत आहे. त्यासाठी साडेसतरा लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ही पोलीस कोठडी तयार केली जाणार आहे. पुढील महिन्याभरात ही पोलीस कोठडी तयार होईल, अशी माहिती मांडवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रफुल्ल वाघ यांनी दिली.