वसई : वसई-विरार शहरात मार्च महिन्यापासून पाणीटंचाई जाणवू लागली आहे. आधीच पाण्याची कमतरता आणि त्यातच गळती तसेच वितरण व्यवस्था नसल्याने नागरिकांना ४३ दशलक्ष लिटर पाणी कमी मिळत आहे. यामुळे ऐन उन्हाळय़ात पाण्यावाचून हाल होऊ लागले आहे. पालिकेने अद्याप नळजोडण्या देण्यास सुरुवात केलेली नाही. दुसरीकडे पालिकेने दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला असून पाणीटंचाईमुळे पालिकेने टॅंकरने पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.

वसई-विरार शहराला सुर्या प्रकल्पाच्या दोन्ही टप्प्यांतून २३० दशलक्ष लिटर, पेल्हार धरणातून १० आणि उसगाव धरणातून २० दशलक्ष लिटर्स असा एकूण २३० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होत आहे. शहराला ३२६ दशलक्ष लिटर पाण्याची गरज असताना केवळ २२० दशलक्ष लिटर पाणी मिळते. त्यातही पाण्याच्या गळतीचे प्रमाण हे १५ टक्क्यांहून अधिक आहे. त्यामुळे नागरिकांना केवळ १९० दशलक्ष लिटर पाणी मिळते. दररोज ४३ दशलक्ष लिटर पाणी कमी असल्याने नागरिकांना उन्हाळय़ात तीव्र पाणीटंचाईच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. शहराच्या धरणात मुबलक पाणी असले तरी नागरिकांना मात्र पाणी मिळत नाही. पाण्याचे नियोजन करण्यासाठी पालिकेने दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केलेला आहे. मात्र अनेक भागांत दोन ते तीन दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत.

nagpur, New Underpass, Road Under Railway line, Manas Chowk, Causes Issues, Large Vehicles, Traffic Congestion,
मानस चौकातील भुयारी मार्गामुळे नागपूरकरांना भोवळ! बोगदा संपताच सिग्नल असल्याने वाहतूक कोंडी
Agitation on behalf of Vanchit Bahujan Aghadi yavatmal
“रिकामी माझी घागर…” पाणी समस्या सोडविण्यासाठी ‘वंचित’चे असेही आंदोलन…
nagpur, wrong landing point, construction, bridge, kasturchand park, confusion in drivers, traffic congestion,
वाहतूक कोंडीमुळे नागपूरकर हैराण! कस्तूरचंद पार्कजवळील पुलाचे लँडिंग चुकले…
Criminal action in case of beating of MSEDCL employees
महावितरण कर्मचाऱ्यांना मारहाण केल्यास महागात पडणार

अमृत योजनेंतर्गत शहरात जलवाहिन्या टाकण्याचे तसेच १८ जलकुंभ बांधण्याचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र आतापर्यंत केवळ सहा जलकुंभाचे काम पुर्ण झाले असून मार्चअखेरीस आणखी एक जलकुंभ तयार होणार असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. जलवाहिन्या अंथरण्याचे काम मे किंवा जूनपर्यंत पूर्ण होणार आहे. त्यामुळे नागरिकांना उन्हाळय़ात तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.

खोलसापाडा धरणाची आशा

खोलसापाडा पाणी योजनेच्या कामालाही गती देण्यात आली आहे. उसगावजवळील खोलसापाडा धरणाच्या टप्पा क्रमांक १ आणि टप्पा क्रमांक २ अशा दोन स्वतंत्र योजना असून त्या दोन्ही योजनांच्या टप्प्यातून पालिकेला ७० दशलक्ष लिटर पाणी मिळणार आहे. टप्पा क्रमांक २ मधून दररोज २० दशलक्ष लिटर पाणी मिळणार आहे. लघुपाटबंधारे खात्यामार्फत ही योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेसाठी पालिका निधी उपलब्ध करून देणार आहे. दोन वर्षांत ही योजना पूर्ण केली जाणार आहे. खोलसापाडा धरण योजनेंतर्गत दोन टप्पे असून पहिला टप्पा हा ११० कोटींचा आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यातून ५० दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होणार आहे.

नवीन नळजोडण्या नाहीच

पाणी नसल्याने पालिकेने अनेक भागांत टॅंकरने पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी प्रस्ताव मागितले आहे. शहरात असलेल्या ग्रामीण भागात आणि उंच भागात जेथे जलवाहिन्या नाहीत तसेच पाणी कमी दाबाने मिळते, अशा ठिकाणी या टॅंकरने पाणीपुरवठा केला जाणार आहे. दरम्यान, पालिकेने अद्याप नवीन नळजोडण्या देण्यास सुरुवात केली नसल्याने नागरिकांच्या रोषात भर पडली आहे. सध्या पालिकेकडे बाराशेहून अधिक नळजोडण्यांचे प्रस्ताव प्रलंबित आहे. मार्च महिन्यापर्यंत आम्ही पाणीपट्टी वसुलीवर भर देणार आहोत त्यानंतर नवीन नळजोडण्यांबाबत निर्णय घेऊ, असे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. पालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांनी नळजोडण्यांच्या प्रलंबित प्रस्तांवाचा आढावा घेतला जाणार असल्याचे सांगितले.

 विरार शहरात सर्वाधिक समस्या

मार्च महिन्यातच  विरारकरांना पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. अनेक भागात तीन ते चार दिवसाआड पाणी येत आहे तर अनेक भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत  असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. विरार शहरात सर्वाधिक कमी दाबाने आणि अनियमित पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. पण पालिका मात्र नियमित पाणी पुरवठा सुरु असल्याचा दावा करीत आहे.   त्यात पाणी चोरीच्या घटना सुद्धा वाढताना दिसत आहेत. विरार पूर्व परिसरात चंदनसार ते मनवेल पाडा परिसरात कमी दाबाने आणि अनियमित पाणी पुरवठा होत आहे. अनेक ठिकाणी तीन चार दिवसाआड पाणी पुरवठा होत असून कमी दाबाने आणि काही मिनिटासाठी पाणी येत असल्याने नागरिकांच्या पाण्यासाठीच्या समस्या वाढल्या आहेत.

मनवेल पाडा येथील अनेक इमारतीत पुरेपूर पाणी न मिळत नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत. त्यात पाणी पुरठय़ाची कोणतीही वेळ पालिकेकडून पाळली जात नाही.  अनेकांना पाणी  विकत  घेऊन आपली गरज भागवावी लागत आहे. त्यात बाटलीबंद पाण्याचे दर सुद्धा वाढले असल्याने नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. विरारमध्ये अनेक चाळीच्या परिसरात तर तीन ते चार दिवसाआड पाणी सोडले जाते तर काही भागात  दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. यामुळे चाळीत राहणाऱ्या नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

वर्षभर पाणीटंचाईचे संकट

एमएमआरडीएतर्फे सुर्या पाणी प्रकल्पातून ४०३ दशलक्ष लिटर्स पाणीपुरवठा करण्याची योजना आहे. त्यातील १८५ दशलक्ष लिटर पाणी वसई-विरार शहरासाठी आणि २१८ दशलक्ष लिटर पाणी मीरा-भाईंदर शहरासाठी देण्याची योजना आहे. वसई-विरार शहरातील पाण्याची गरज लक्षात घेता हे काम तातडीने सुरू केले जात असल्याची माहिती एमएमआरडीने दिली होती. प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली असली तरी वसईकरांना हे पाणी डिसेंबर २०२२ पर्यंत मिळणार नाही. त्यामुळे वसई-विरारमधील नागरिकांना वर्षभर पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.