वसई : बदलापूर शाळेतील प्रकरणानंतर नालासोपारा मधील यादवेश विकास शाळेतील मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाने जोर धरला आहे. या शाळेतील मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचारी विशेष तपास पथक स्थापन चौकशी करण्याची मागणी शिवसेना ठाकरे गटाने केली आहे. पीडीत मुलीच्या भावाने शाळेतील २५ हून अधिक मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप केला आहे.

मागील आठवड्यात नालासोपार्‍याच्या यादवेश विकास इंग्रजी शाळेत शिक्षकाकडून विद्यार्थींनीवर बलात्काराचे प्रकरण उघडकीस आले आरोपी अमित दुबे (३०) हा नालासोपारा पूर्वेच्या संतोषभुवन येथील यादवेश विकास इंग्रजी शाळेत शिक्षक आहे. तसेच तो वलईपाडा येथे उज्वल नावाचे खासगी शिकवणी वर्ग (क्लासेस) घेतो. या शाळेत शिकणार्‍या १४ वर्षाच्या विद्यार्थिनीवर त्याने क्लास मध्ये शिकविण्याचा बहाण्याने बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. यानंतर वारंवार तिला धमकावून तिच्या शाळेत तसेच शिकवणी वर्गात बलात्कार करत होता. मार्च ते जुलै असे ५ महिने तो या विद्यार्थीनीवर बलात्कार करत होता. ११ ऑगस्ट रोजी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर तिच्या पालकांनी याप्रकऱणी पेल्हार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी अमित दुबे याला भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४(२)(एफ) ६५(१) तसेच बालकांच्या लैंगिक अत्याचापासून संरक्षण (पोक्सो)च्या कलम ४, ५. ८ आणि १२ अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली होती. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे.

Pune Crime News
Pune Crime : “पुण्यात विद्यार्थिनींवर झालेल्या अत्याचाराची घटना भयंकर, शाळा प्रशासन..”, सुशीबेन शाह यांनी काय म्हटलंय?
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
Badlapur Sexual Assault Case Update
Badlapur Sexual Assault Case: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल, सचिव तुषार आपटे यांना जामीन, दुसऱ्या प्रकरणात मात्र अटक
school van driver rapes school girl
पुण्यातील वानवडी लैंगिक अत्याचार प्रकरणात वापरलेल्या स्कूल व्हॅनची तोडफोड
akshay shinde s father in high court
बदलापूर लैंगिक अत्याचाराचे प्रकरण : पुरावे नष्ट करण्याची भीती व्यक्त करून अक्षय शिंदेच्या वडिलांची उच्च न्यायालयात धाव
navi mumbai police registered case under pocso act against youth for child sexual abuse
नवी मुंबई : बाल लैंगिक अत्याचारप्रकरणी तरुणावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा
Odisha army officers fiance sexual assault news
लष्करातील जवानाच्या होणाऱ्या पत्नीचा पोलीस ठाण्यातच लैंगिक छळ, दोन महिला पोलीस कर्मचाऱ्यांसह पाच जण निलंबित
Female trainee doctor molested by professor in nair hospital
डॉक्टरकडून वैद्याकीय विद्यार्थिनीचा विनयभंग; नायर रुग्णालयातील घटना, तिघांवर कारवाई करण्याची शिफारस

हेही वाचा…वसई: नकली पोलिसाची प्रेमी जोडप्यांकडून वसुली

बदलापूर येथील शाळेतील मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणानंतर यादवेश शाळेतील प्रकरणाने पुन्हा जोर धरला आहे. या शाळेतील २५ पेक्षा जास्त मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप पीडित मुलीच्या भावाने केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची विशेष तपास पथक स्थापन करून चौकशी करण्याची मागणी शिवसेना (ठाकरे गट) जिल्हा सरचिटणीस ॲड अनिल चव्हाण यांनी केला आहे. पीडित मुलीने शाळेतील मुख्याध्यापकांकडे शिक्षकाच्या आक्षेपार्ह वर्तनाची तक्रार केली होती. तसेच हा प्रकार शाळेने दडपला त्यामुळे शाळा व्यवस्थापकाविरोधातही गुन्हे दाखल करण्याची मागणी ॲड चव्हाण यांनी केली आहे.

हेही वाचा…वसई : पालिका अधिकार्‍याची शोकांतिका; मुलाच्या निधनाचा धक्का, हदयविकाराने झाला मृत्यू

शाळेतील शिक्षकांचे जबाब सुरू

याप्रकरणी पेल्हार पोलिसांनी आता शाळेतील शिक्षक आणि इतर कर्मचार्‍यांचे जबाब नोंदविण्यास सुरवात केली आहे. अन्य कुठल्या मुलींसोबत असा प्रकार घडला आहे का त्याचा आम्ही तपास करत असल्याची माहिती पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी दिली. आरोपी अमित दुबे सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. शाळा पुन्हा सुरू झाली आहे. मात्र शाळा अनधिकृत असून ती किमान पुढील शैक्षणिक वर्षात बंद करावी आणि विद्यार्थ्यांचे नुकसान टाळावे, अशी मागणी पालिकांनी केली आहे.