लोकसत्ता प्रतिनिधी

वसई : नालासोपार्‍यात १० वर्षीय मुलीवर दोन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आचोळे पोलिसांनी याप्रकरणी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

Gang rape with married woman at knife point
नालासोपार्‍यात सामूहिक बलात्काराची चौथी घटना, चाकूचा धाक दाखवून विवाहितेवर सामूहिक बलात्कार
bigg boss 18 advocate Gunaratna sadavarte entry with pet donkey max in salman khan show watch promo
Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंची शोमध्ये एन्ट्री,…
Delhi Crime Case Doctor Murder
Delhi Doctor Murder Case : विवाहबाह्य संबंध, लग्नाचं आमिष अन् हत्या; दिल्लीतील हत्याप्रकरणी डॉक्टर, नर्स आणि अल्पवयीन मुलामधील संबंधांचा उलगडा!
online gambling, youth suicide Virar,
ऑनलाईन जुगारात कर्जबाजारी, गुजरातमधील तरुणाची विरारमध्ये आत्महत्या
maratha life foundation ngo care orphans in vasai
सर्वकार्येषु सर्वदा : अनाथांचा आधार असलेल्या संस्थेला आर्थिक पाठबळाची गरज
vasai nala sopara marathi news
नालासोपार्‍यात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, एका आरोपीला अटक
cops molested young lady attempted kidnapping two vasai policemen suspended
पोलिसांकडूनच तरुणीचा विनयभंग, अपहरणाचा प्रयत्न; नागरिकांनी पोलिसांना चोपले, वसईतील दोन पोलीस निलंबित
Who killed Akshay Shinde Encounter Badlapur Sexual Assault Case Update in Marathi
Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदेवर गोळी झाडणारा पोलीस अधिकारी कोण? चकमकफेम प्रदीप शर्मांबरोबर केलं होतं काम

नालासोपारा पूर्वेच्या शिर्डीनगर परिसरात ही १०वर्षीय पीडित मुलगी आपल्या कुटुंबासोबत राहत आहे. २ सप्टेंबर रोजी परिसरात गणेश आगमन सोहळा पाहण्यासाठी ही मुलगी गेली होती. तिथून घरी परतत असताना घराच्या जवळच्या परिसरात दोन व्यक्तींनी तिला रस्त्यात अडवून तिला निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर आळीपाळीने दोघांनी तिच्यावर बलात्कार केला.

आणखी वाचा-सर्वकार्येषु सर्वदा : अनाथांचा आधार असलेल्या संस्थेला आर्थिक पाठबळाची गरज

या पीडित मुलीचे कपडे रक्ताने खराब झाले होते. व तिची प्रकृती ठीक नसल्याने घरच्यांना मुलीसोबत गैरप्रकार घडल्याचा संशय आला. त्यानंतर मुलीची चौकशी केली असता घडलेला सर्व प्रकार आपल्या पालकांना सांगितला. त्यानंतर तिच्या आईने आचोळे पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली आहे.

या तक्रारीनंतर पोलीसांनी गुन्हा दाखल करून दोन आरोपींना अटक केली आहे. याचा अधिकचा तपास सुरू असल्याची माहिती वरीष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी दिली आहे. यापूर्वी सुध्दा नालासोपारा पूर्वेच्या भागात १७ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली होती. एकापाठोपाठ एक अशा लैंगिक अत्याचाराच्या घटना समोर येत असल्याने पुन्हा एकदा महिला व मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.