भाईंदर :- भरधाव वेगाने सायकल वरून येणार्‍या एका तरूणाचा भींतीला धकडून मृत्यू झाला आहे. मिरा रोड येथे ही घटना घडली आहे. नीरज यादव (१६)  असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून तो मिरा रोडच्या गीता नगरचा रहिवासी आहे. २८ ऑक्टोबर रोजी तो मित्रांसोबत सायकलने घोडबंदर किल्यावर फिरायला गेला होता. संध्याकाळी तो सायकलने परतत होता. त्याची सायकल वेगात होती.

एका गल्लीतून येत असताना त्याच्या सायकलवरील ताबा सुटला आणि तो बाजूच्या भिंतीला जाऊन आदळला. त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या संदर्भात काशीगाव पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Story img Loader