३१ डिसेंबरच्या रात्री नववर्षाच्या स्वागतासाठी विनापरवना मद्या पिणार्‍यांवर तसेच विनापरवाना मद्य विक्री करणार्‍यांवर कारवाई केली जाणार आहे. यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागातातर्फे वसईच्या समुद्रकिनार्‍यावर ‘दवंडी पिटविण्यात येत आहे.परवाना नसताना मद्य विक्री करणे हा गुन्हा आहे.

मात्र ३१ डिसेंबरच्या रात्री नववर्षाच्या स्वागतासाठी वसई विरारच्या समुद्रकिनार्‍यावर असलेल्या रिसॉर्ट आणि ढाब्यांमध्ये बेकायदेशीरपणे मद्य विक्री करण्यात येत असते. मद्य पिण्यासाठी आणि मद्यापार्टीसाठी देखील परवाना आवश्यक असतो. मात्र पालघर जिल्हयात केवळ १६ जणांनीच मद्य परवाना घेतला आहे. त्यामुळे नागरिकांनी मद्य परवाना घेऊनच नववर्षाचे स्वागत करावे असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाने केले आहे.

Robin Hood thief from Bihar
फक्त स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने करायचा घरफोडी; बिहारच्या ‘रॉबिन हूड’ला केरळमध्ये केलेली चोरी पडली महागात
Kandalvan, Kandalvan belt,
ज्वलनशील पदार्थांद्वारे कांदळवनावर घाला, सिडकोकडील २३० हेक्टर कांदळवन पट्टा हस्तांतरीत करण्यास टाळाटाळ कशासाठी ?
Loksatta anvyarth wheat rates Pradhan Mantri Garib Kalyan Food Yojana to Central Government
अन्वयार्थ: गव्हाचा सरकारी तिढा!
Slum cleaning contract in court tender extended till April 3
झोपडपट्टी स्वच्छतेचे बहुचर्चित कंत्राट न्यायालयीन कचाट्यात, निविदेला ३ एप्रिलपर्यंत मुदतवाढ

हेही वाचा: भाजपाच्या माजी आमदाराच्या बंगल्यामागे आढळला महिलेचा कुजलेला मृतदेह! साताऱ्यात खळबळ

याबाबत माहिती देण्यासाठी सध्या वसईच्या किनारपट्टीवरील कळंब, राजोडी, नवापूर, भुईगाव या भागात दंवंडी पिटवून जनजागृती केली जात आहे. परवाना नसताना मद्य विक्री केल्यास महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच कलम ६९ नुसार तर विनापरवाना सार्वजनिक ठिकाणी मद्य पिल्यास कलम ८४ अन्वये कारवाई केली जाणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाचे प्रमुख शंकर आंबेरकर यांनी दिली. कारवाईसाठी विविध पथके स्थापन करण्यात आली आहेत.