वसई:  वसई पूर्वेतील तुंगारेश्वर येथे येणाऱ्या भाविक व पर्यटक यांच्याकडून आकारले जाणारे प्रवेशशुल्क अखेर राज्य शासनाने  कमी केले आहे. पूर्वी ५८ रुपये आकारले जाणारे प्रवेशशुल्क ३० रुपये एवढे करण्यात आले आहे. यासाठी तुंगारेश्वर देवस्थान शासनाकडे पाठपुरावा करत होते. 

वसई तालुक्याच्या पूर्वेकडील भागात तुंगारेश्वर पर्वत आहे. या पर्वतावर तुंगारेश्वर देवस्थान आहे. निसर्गरम्य पर्वतांच्या कुशीत असलेल्या श्रीतुंगारेश्वर महादेव मंदिराला महाराष्ट्र शासनाने सन २००० साली ‘क’ वर्गीय पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. या ठिकाणी दररोज मोठय़ा संख्येने भाविक शंकर महादेवाच्या दर्शनासाठी येत असतात.

Nagpur, Maherghar, safe delivery
नागपूर : सुरक्षित प्रसूतीसाठी चार माहेरघर कधी?
Traffic congestion, Divisional Commissioner office area,
विभागीय आयुक्त कार्यालय परिसरातील वाहतुकीचा बोजवारा, वाहनचालकांना पाच ते दहा किलोमीटरचा वळसा
Northwest Mumbai beautification of Jogeshwari Caves is sometimes under construction awaiting rehabilitation
आमचा प्रश्न : वायव्य मुंबई – जोगेश्वरी गुंफेचे सुशोभीकरण कधी प्रकल्पबाधितही पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत
rail line to Karjat
कर्जतला जाण्यासाठी आणखी एक रेल्वे मार्ग, पनवेल – कर्जत रेल्वे मार्ग डिसेंबर २०२५ पूर्ण करण्याचे उद्दिष्ट्य

मंदिर हे वन विभागाच्या तुंगारेश्वर अभयारण्यात येत असल्यामुळे वन विभाग प्रत्येक भाविक व पर्यटकांकडून प्रवेश शुल्क म्हणून ५८ रुपये  घेत आहेत. त्यामुळे तुंगारेश्वर महादेव मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना नाहक भुर्दंड भरावा लागत होता. मात्र त्या बदल्यात कोणत्याही प्रकारच्या सुविधा दिल्या जात नाहीत. तुंगारेश्वर महादेव मंदिरापर्यंत जाणारा तीन किमी पक्का रस्ता, दोन नाल्यांवर पक्का पूल, शौचालय, पिण्याचे पाणी, प्राणिसंग्रहालय यापैकी एकही सुविधा दिलेली नाही. तरीही वन खात्यामार्फत प्रतिमाणसी प्रवेशशुल्क वसूल केले जाते ते रद्द करून भाविकांना महादेवाचे दर्शन मिळावे यासाठी श्रीतुंगारेश्वर देवस्थान विश्वस्त मंडळ प्रयत्न करत होते. नुकत्याच संपलेल्या हिवाळी अधिवेशनात तुंगारेश्वर देवस्थान विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष रमेश घोरकना, माजी नगरसेवक मिलिंद घरत, आमदार हितेंद्र ठाकूर, आमदार राजेश पाटील यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन हा प्रश्न मांडला होता. त्यावेळी त्यांनी प्रवेश शुल्क कमी करण्याचे आश्वासन दिले होते.

गुरुवारी शासनाने यासंदर्भात अध्यादेश जाहीर करून प्रवेश मूल्य  ५० टक्क्यांनी कमी केले आहे. आता भाविकांना ५८ रुपयांऐवजी ३० रुपये प्रवेश मूल्य  द्यावे लागणार आहे. त्यामुळे भाविकांना दिलासा मिळाला आहे.