scorecardresearch

प्रेयसीची हत्या करून प्रियकराची आत्महत्या;वसईच्या लॉज मधील धक्कादायक प्रकार

वसईच्या कळंब येथील एका लॉज मध्ये अल्पवयीन तरुणीची प्रियकराने गळा आवळून हत्या केल्याची घटना उघड झाली आहे.

( आरोपी अभिषेक शहा )

वसई: वसईच्या कळंब येथील एका लॉज मध्ये अल्पवयीन तरुणीची प्रियकराने गळा आवळून हत्या केल्याची घटना उघड झाली आहे. या हत्येनंतर तिचा प्रियकराने बोरीवली येथे रेल्वे खाली उडी मारून आत्महत्या केली.

नालासोपारा पश्चिमेच्या कळंब येथील हर्षद फार्म हाऊस या लॉज मध्ये अभिषेक शहा (२१) हा तरुण त्याच्या १७ वर्षीय अल्पवयीन प्रेयसीसह बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास आला होता. काही वेळाने तो जेवण आणण्यासाठी बाहेर गेला मात्र परतलाच नाही. लॉज मालकाने खोलीत जाऊन पाहिले तेव्हा त्याची प्रेयसी मृतावस्थेत पडली होती. आरोपी अभिषेकने गळा आवळून तिची हत्या केल्याचे अर्नाळा सागरी पोलिसांनी सांगितले. हत्येनंतर फरार झालेल्या प्रियकराने संध्याकाळी बोरिवली रेल्वे स्थानकाजवळ धावत्या ट्रेन समोर उडी मारून आत्महत्या केली.

हे जोडपे नालासोपारा पूर्वेच्या शिर्डी नगर येथे राहत होते . आरोपी प्रियकर अभिषेक त्याच्या प्रेयसीला अश्लील फोटोच्या आधारे ब्लॅकमेल करत होता. मंगळवारी प्रेयसीने मंगळवारी घरातून १५ हजार रुपये घेतले होते, अशी माहिती अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू माने यांनी दिली.

सव्वा महिन्यातील दुसरी घटना

लॉज मध्ये नेऊन प्रेयसीची हत्या करण्याची मागील सव्वा महिन्यातील ही दुसरी घटना आहे. यापूर्वी १ मार्च रोजी वसईतील सागर नाईक या तरुणाने त्याची प्रेयसी सायली शहासने हिची वसईतील पापडी येथील स्टेटस लॉज मध्ये नेऊन हत्या केली होती. हत्येनंतर फरार झालेल्या सागरने बिहार मध्ये जाऊन आत्महत्या केली होती.

मराठीतील सर्व वसई विरार ( Vasaivirar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Suicide lover killing beloved shocking vasai lodge harshad farm house arnala marine police amy

ताज्या बातम्या