scorecardresearch

Premium

वसई : टॅकरची वाहनाला धडक दिल्याने वाद, चौघांनी केलेल्या मारहाणीत टॅंकरचालकाचा मृत्यू

हत्येनंतर फरार झालेल्या चौघांना नायगाव पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

tanker driver, car accident, vasai
वसई : टॅकरची वाहनाला धडक दिल्याने वाद, चौघांनी केलेल्या मारहाणीत टॅंकरचालकाचा मृत्यू

वसई : वाहनाला धडक दिल्याने झालेल्या वादातून वाहनातील चौघांनी टॅंकरचालकाला बेदम मारहाण केली. या मारहाणीत टॅंकरचालकाचा मृत्यू झाला मुंबई अहमदाबाद महामार्गावरील मालजीपाडा येथे रविवारी सकाळी ही घटना घडली. हत्येनंतर फरार झालेल्या चौघांना नायगाव पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

रामकिशोर पुशवाह (४०) हा खासगी कंपनीत चालकाचे काम करतो.. रविवारी तो कंपनीचा टॅंकर घेऊन मुंबई अहमदाबाद महामार्गावरून गुजराथच्या दिशेन जात होता. सकाळी साडेसहाच्या सुमारास त्यांचा टॅंकर मालजीपाडा येथून जात असताना एका चारचाकी वाहनाला धडक दिली. या धडकेत वाहनाचे नुकसान झाले होते. वाहनातील चौघांनी रामकिशोर यांच्याकडे नुकसान भरपाईची मागणी केली. मात्र रविवार असल्याने कंपनी बंद आहे. सोमवारी कंपनीत बोलून भरपाई दिली जाईल असे रामकिशोर यांने सांगितले. मात्र त्यावर वाहनातील चौघांचे समाधान झाले नाही. त्या चौघांनी रामकिशोर याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर चौघेही आरोपी फरार झाले.

Two accused who raped minor girl
चिमुकलीवर बलात्कार करणाऱ्यांना कारागृहातून घेतले ताब्यात; दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी
solapur rape victim girl, rape victim girl attacks on police constable
बलात्कार खटल्यात आरोपीला जामीन; संशयावरून पीडितेने दिली हवालदाराची सुपारी
young woman was raped by man
पुणे: पार्टीवरुन घरी निघालेल्या तरुणीवर मदतीच्या बहाण्याने बलात्कार
MNS Protest
“टोलनाक्यावर दगडं मारून एकनाथ शिंदे…”, मनसे नेत्याची टीका; आंदोलन केल्याने पोलिसांनी घेतलं ताब्यात!

हेही वाचा… अतिवृष्टी, पुराच्या घटनांमध्ये महाराष्ट्र देशात द्वितीय स्थानी; राज्यात वीज पडण्याच्या ४७ घटनांची नोंद

हेही वाचा… वसई : ८० कोटींच्या कंत्राटाचे आमिष, व्यापार्‍याची दीड कोटींची फसवणूक

या प्रकऱणी नायगाव पोलिसांनी चौघांविरोधात सदोष मनुष्यवधाचा कलम ३०४, ४२७,३४ अन्वये गुन्हा दाखल केला होता. सीसीटीव्ही आणि प्रत्यक्षदर्शीच्या आधारे पोलिसांनी वाहनाचा क्रमांक मिळवला आणि सोमवारी चौघांना अटक केली. अटक केलेले आरोपी नालासोपारा येथे राहणारे आहेत. आम्ही आरोपींना अटक केली आहे. वाहनाला दिलेल्या धडकेतून झालेल्या वादातून हा प्रकार घडल्याचे नायगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे यांनी सांगितले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Tanker driver dies after being beaten up by four people after car accident incident asj

First published on: 02-10-2023 at 19:21 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×