scorecardresearch

विरार येथे गॅरेजला भीषण आग

विरार पूर्वेतील महामार्गालगत असलेल्या समर्थ गॅरेजला भीषण आग लागली आहे.

वसई: विरार पूर्वेतील महामार्गालगत असलेल्या समर्थ गॅरेजला भीषण आग लागली आहे. मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. या आगीवर अग्निशमन दलाकडून नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू आहे.

विरार पूर्वेतील  स्टेशन परिसरात जाणाऱ्या रस्त्याशेजारी असलेल्या समर्थ गॅरेजचे दुकान आहे. मंगळवारी रात्री दुकानाला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे.यामुळे आजूबाजूच्या भागात खळबळ उडाली होती. या आगीमध्ये गॅरेजमधील दुरुस्तीसाठी आलेली वाहने व वस्तूचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र ही आग कोणत्या कारणामुळे लागली आहे याचं कारण समजू शकले नाही. अचानक  लागलेल्या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल होऊन नियंत्रित करण्यात आली आहे. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेमुळे आजूबाजूला राहत असलेल्या व ये जा करणाऱ्या नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

मराठीतील सर्व वसई विरार ( Vasaivirar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Terrible fire garage fire brigade van ysh

ताज्या बातम्या