scorecardresearch

Premium

वसई : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून अश्लील छायाचित्रे वायरल, फरार आरोपीला मध्यवर्ती गुन्हे शाखेकडून अटक

अल्पवयीन मुलींशी फेसबुकवर ओळख करून त्यांच्यावर बलात्कार करणार्‍या एका आरोपीला मध्यवर्ती गुन्हे शाखेने अटक केली आहे.

Rape on Woman in mumbai
मुंबईत तरुणीवर बलात्कार, तरुणीने पोस्ट करुन सांगितली आपबिती (प्रातिनिधिक छायाचित्र)

वसई- अल्पवयीन मुलींशी फेसबुकवर ओळख करून त्यांच्यावर बलात्कार करणार्‍या एका आरोपीला मध्यवर्ती गुन्हे शाखेने अटक केली आहे. मागील एक महिन्यांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता.

नालासोपारामध्ये राहणार्‍या एका १७ वर्षीय अल्पवयीन तरुणीची ओळख फेसबुकवर आदित्य भगत नावाच्या तरुणाशी झाली होती. या काळात आरोपीने पीडित तरुणीशी बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. यानंतर मुलीने नकार दिल्यानंतर तिची अश्लील छायाचित्रे इन्स्टाग्रामवर प्रसारीत करुन तिची बदनामी केली होती. यामुळे या मुलीने आत्महत्या करण्याचादेखील प्रयत्न केला होता. याप्रकरणी आचोळे पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात कलम ३७६, ३७६ (२) (एन), ५०९, ५०६, बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियमाच्या (पोक्सो) कलम ४, ६, ८, १२, १४ तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलम ६७ (अ) ६७ (ब) अन्वये गुन्हे दाखल केला होता. मात्र आरोपी फरार झाला होता.

Suicide of minor married girl funeral was done mutual case was registered after two months
अल्पवयीन विवाहित मुलीची आत्महत्या; अंत्यविधी परस्पर उरकला; दोन महिन्यांनी गुन्हा दाखल
uddhav thackeray shiv sena protest against zilla parishad officers for dancing on zingaat song
सांगली: जिल्हा परिषद अधिकाऱ्यांचे झिंगाट नृत्यावर शिवसेनेचा आक्षेप, कारवाई करण्याची मागणी
central government stand sec 498a ipc for domestic violence in bombay hc
महिलांच्या हितासाठी कौटुंबिक अत्याचाराचे ४९८ ए कलम दंडात्मक करू शकत नाही, भूमिकेचा केंद्र सरकारतर्फे उच्च न्यायालयात पुनरूच्चार
Crime against distributor of memory card of obscene footage of girl mumbai
तरूणीच्या अश्लील चित्रीकरणाचे मेमरीकार्ड वितरण करणाऱ्या विरोधात गुन्हा; चित्रीकरणाद्वारे धमकावून अनेकवेळा बलात्कार

हेही वाचा – वसई : इन्स्टाग्रामवर वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली महिलेची फसवणूक, ५ दिवसांत महिलेने गमावले चक्क १६ लाख रुपये

हेही वाचा – वसई : रुग्णालयांमध्ये रुग्णांची सनद ऐवजी रुग्णांना इशारा देणारे फलक

हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने या प्रकरणाचा तपास मध्यवर्ती गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला होता. पोलीस उपनिरीक्षक हितेंद्र विचारे आणि त्यांच्या पथकाने या प्रकरणाचा तपास करून तांत्रिक विश्लेषण करून आरोपीचा माग काढला आणि त्याला भाईंदर येथून अटक केली. आरोपी हा भाईंदरमध्ये मोबाईलच्या दुकानात मोबाईल दुरुस्तीचे काम करतो. त्याने अन्य कुठल्या मुलींची फसवणूक केली आहे का त्याचा तपास पोलीस करत आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The accused who raped a minor girl and circulated obscene pictures was arrested ssb

First published on: 05-12-2023 at 14:00 IST

आजचा ई-पेपर : वसई विरार

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×