वसई विरार शहरात भटक्या श्वानांचा उपद्रव ही आता शहरासाठी एक मोठी समस्या बनली आहे. शहरात दिवसागणिक वाढत असलेल्या श्वान दंशाच्या घटना या समस्येची भीषणता अधिकच प्रखरपणे अधोरेखित होत आहे. मात्र त्यावर उपाययोजना आखण्यात पालिकेला अपयश आले आहे. त्याचाच परिणाम हा शहरात दिसू लागला आहे. लहान चिमुकल्या पासून वयोवृद्ध अशा सर्वांवरच श्वानांचे हल्ले होऊ लागले आहेत. त्यामुळे शहरात आता भटक्या श्वानांची एकप्रकारे दहशत निर्माण झाली आहे.

शहरात विविध ठिकाणच्या भागात गेल्या काही महिन्यांपासून भटक्या श्वानांचा वावर हा मोठ्या प्रमाणात वाढला असल्याचे चित्र अनेकदा समोर आले आहे. घराच्या समोर खेळत असलेल्या लहान मुलांचे लचके तोडण्यापासून ते रात्रीच्यावेळी कामावरून चालत येणाऱ्या नागरिकांवर , दुचाकीस्वारांवर हल्ले करण्यापर्यंत श्वानांची मजल गेली आहे. विशेष करून हे भटके श्वान एकत्रित समूहाने वावरतात. तर समूहाने हल्लाही चढवत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

ramabai Ambedkar hoarding vandalized
माता रमाई आंबेडकर यांच्या फलकाचा अवमान; कोपरगाव शहर बंद, शहरात तणाव, मोठा जमाव रस्त्यावर
pandit hridaynath Mangeshkar
हृदयनाथ मंगेशकर आकाशवाणीच्या नोकरीत खरंच होते का? कधी?
important difference between lease transfer and sale deed
भाडेपट्टा हस्तांतरण आणि खरेदीखतमहत्त्वाचा फरक!
Chief Minister Devendra Fadnavis gave a strong response after Rahul Gandhi criticism
दिल्लीच्या निकालानंतर काँग्रेस संपेल…मुख्यमंत्र्यांनी थेट तारीखच…
vasai virar loksatta news
वसई : निधी मिळाला, तीनदा भूमीपूजनही झाले मात्र रुग्णालय नाही; आचोळे रुग्णालयाची प्रतीक्षा कायम
Ten citizens of Bondgaon have gone bald to show sympathy towards patients of village who suffering from hairloss
मनोबल वाढविण्यासाठी सामूहिक मुंडन!
Rane family on Sindhudurg DPDC
सिंधुदुर्ग डीपीडीसी पूर्णपणे राणे कुटुंबीयांच्या ताब्यात; इतर कोणत्या जिल्ह्यात एकाच कुटुंबाचा वरचष्मा?
Nagpur, mango tree , Bhonsale period ,
भोसलेकालीन ‘आमराई’ ओसाड होण्याच्या मार्गावर!

हे ही वाचा… उपचाराच्या नावाखाली महिलेवर बलात्कार, भोंदू मांत्रिकाला अटक

टिटवाळ्यात एका गृहसंकुलाच्या जवळील परीसरात ६० वर्षाची एक महिला पायी चालली होती. या महिलेला पाहून या भागातील चार भटके श्वान तिच्या अंगावर धावून गेले. चारही श्वानांनी एकावेळी या महिलेवर हल्ला केल्याने महिला जमिनीवर कोसळली. भटक्या श्वानांनी महिलेचे कपडे, तिच्या शरीराला चावे घेऊन तिला घायाळ केले. या महिलेने सुरूवातीला भटक्या श्वानांच्या तावडीतून सुटण्यासाठी प्रयत्न केले. एकाचवेळी चारही श्वान आक्रमकपणे महिलेवर हल्ला करत होते. याचे सीसीटीव्ही ही चित्रण ही समाजमाध्यमावर पसरले होते. यातून भटक्या श्वानांची दहशत किती आहे हे लक्षात येईल. अशीच गंभीर स्थिती ही वसई विरार भागातही पाहायला मिळत आहे.

नुकताच वसईच्या पारनाका गौळवाडा भागात एकाच दिवशी २७ जणांचा तर नालासोपारा स्थानक परिसरात १५ जणांना श्वान दंश केल्याची घटना घडली होती. तर २७ मे २०२४ रोजी अर्नाळ्यात ही एकाच दिवशी २८ जणांना श्वान दंश झाला होता. यापूर्वी सुद्धा भटक्या श्वानांनी लचके तोडल्याच्या घटना घडल्या आहेत. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमधून प्रशासन काहीच बोध घेत नसल्याने आज समस्या अक्षरशः गंभीर बनली आहे.
भटक्या श्वानांनी हल्ला केल्याच्या व दंश केल्याच्या अनेक घटना वारंवार समोर येऊ लागल्या आहेत. यंदाच्या वर्षात ३३ हजार १७ श्वानदंशाच्या घटना घडल्या आहेत. तर २०२० ते २०२४ या पाच वर्षात शहरात १ लाख ८ हजार ६७६ इतक्या श्वान दंश झाल्याच्या घटनांची नोंद करण्यात आली आहे.

या भटक्या श्वानांना नियंत्रणात आणण्यासाठी पालिकेचे केवळ एकच निर्बीजीकरण केंद्र आहे. त्यांच्यामार्फत प्रयत्न केले जातात.पालिकेने दिलेल्या माहितीनुसार मागील तीन वर्षात १० हजार २५५ श्वानांचे निर्बिजीकऱण करण्यात आले आहे. परंतु या केंद्राची निर्बिजीकरण करण्याची गती ही मंदावलेली असल्याने त्याचा परिणाम हा शहरात दिसू लागला आहे. भटक्या श्वानांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. असे असताना त्यांच्या निर्बीजीकरणाची प्रक्रिया खूप धीम्या गतीने सुरू आहे. त्यामुळे या भटक्या श्वानांवर नियंत्रण मिळविणे कठीण होऊन बसले आहे.

वसई विरार मधील अनेक ठिकाणी रस्त्यावरच कचरा टाकला जातो. यामुळे कचऱ्याच्या सोबतच शिळे खाद्यपदार्थ टाकून दिले जातात. याचा शोध घेण्यासाठी श्वान हे सर्व कचरा तोंडात पकडून रस्त्यावर पसारा करतात. यामुळे आजूबाजूच्या परिसरात दुर्गंधीचे वातावरण पसरत असते. असे प्रकार घडू नये यासाठी नागरिकांनी सुद्धा कचरा उकिरड्यावर न टाकता कचरा कुंडीत टाकणे गरजेचे आहे. जास्त प्रमाणात कचरा जमा होणार नाही याचीही काळजी घेतली पाहिजे. त्याचबरोबर लोकांनीही हातातील उरलेसुरलेले काहीही रस्त्यात टाकण्याची, फेकण्याची सवय सोडायला हवी.

रस्त्यावरून ये जा करणाऱ्या नागरिकांच्या हातात पिशवी दिसली की श्वान त्यांचा पाठलाग करतात. कधी लक्ष नसल्यास अचानकपणे चावा घेत आहेत. तर काही ठिकाणी मुख्य रस्त्याच्या ठिकाणी हे श्वान ये जा करणाऱ्या वाहनचालकांच्या अंगावर धावून जातात त्यामुळे अपघाताच्या घटना ही घडतात. काही वेळा भटक्या श्वानांना खाण्यासाठी काही मिळत नसल्याने विविध भागातूनही श्वान हळूहळू एका भागातून दुसऱ्या भागात जातात. तर काही ठिकाणी पाळीव कोंबड्यांचा पाठलाग करून त्यांच्यावरही हल्ला चढवून त्याही फस्त करीत असल्याचे प्रकार घडत आहेत.

हे ही वाचा… शिधापत्रिकांची कामे रखडली, ऑनलाइन शिधापत्रिकेचे संकेतस्थळ आठ दिवसांपासून बंद; कामकाज ठप्प

भटक्या श्वानांचा उपद्रव ही सर्वच शहराची समस्या आहे. परंतु वसई विरार शहराएवढी भीषणता अन्य कुठल्या शहरात नसेल. शहरातील श्वान निर्बिजीकरण केंद्रे रखडलेली असून श्वानांच्या लसीवर मागील तीन वर्षात दीड कोटींपेक्षा अधिक खर्च झालेला आहे. एकीकडे नागरिक श्वानांच्या उपद्रवामुळे भयभीत असताना दुसरीकडे पालिकेच्या तिजोरीवर आर्थिक ताण पडत आहे. परंतु समस्या सुटत नाही. प्रशासनाची उदासिनता याला कारणीभूत असून आता या समस्येवर प्राधान्याने तोडगा काढण्याची गरज निर्माण झाली आहे. आता या उपद्रवाने गंभीर रूप धारण केले असून या भटक्या श्वानांना नियंत्रणात आणण्याचे मोठे आव्हान पालिकेच्या समोर आहे.

निर्बीजीकरणावर भर द्यायला हवा

नवघर पूर्वेच्या भागात पालिकेचे एकमेव निर्बीजीकरण केंद्र आहे. त्यात १६५ इतकेच श्वानांवर उपचार केले जाऊ शकतात. वाढत्या श्वानांच्या उपद्रवामुळे ते ही अपुरे पडू लागले आहे. यासाठी पालिकेने नवीन निर्बीजीकरण केंद्रासाठी चंदनसार व नालासोपारा येथील निर्मळ येथे निश्चित केले होते. मात्र विविध प्रकारच्या अडचणीमुळे ते ही काम रखडले.याशिवाय त्यानंतर खाली इमारती ताब्यात घेऊन त्या ठिकाणी उपचार सुरू करू असे ठरविले होते त्यावरही तोडगा निघाला नसल्याने समस्या जटिल बनू लागली आहे. समस्या आणखीन गंभीर होण्याआधिच निर्बीजीकरणाची क्षमता वाढवायला हवी तर यावर नियंत्रण मिळविणे शक्य होणार आहे.

Story img Loader