वसई: पालघऱ जिल्ह्यासाठी असलेल्या नवीन परिवहन कार्यालयाच्या स्वतंत्र इमारतीच्या कामाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. वसई पूर्वेच्या गोखिवरे येथे १४ कोटी रुपये खर्चून ही इमारत तयार करण्यात येत आहे. या नवीन इमारतीचा आराखडा तयार झाला असून दीड ते दोन वर्षांत काम पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पालघर जिल्ह्याचे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय २०११ पासून विरार पूर्वेच्या चंदनसार येथे अपुऱ्या जागेत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करण्यात आले होते. वसईसह पालघर जिल्ह्यातील आठ तालुक्यांचा कारभार या केंद्रातून चालवला जातो. मात्र हे कार्यालय शहरापासून लांब असल्याने वाहनधारकांची आणि नागरिकांची गैरसोय होत असते. त्यामुळे वसई विरार शहरात उपप्रादेशिक परिवहन विभागाचे केंद्र असावे यासाठी शासनातर्फे डिसेंबर २०१६ मध्ये गोखिवरे येथे जागा मंजूर करण्यात आली होती. त्यानंतर लगेचच फेब्रुवारी २०१७ मध्ये गोखिवरे येथील जागा परिवहन विभागाच्या नावे करण्यात आली होती. या जागेबाबत न्यायालयात दावा दाखल केल्याने या जागेत नवीन कार्यालय तयार करण्याचे काम चार ते पाच वर्षे रखडले होते. त्यानंतर न्यायालयाने ही या जागेच्या संदर्भात हिरवा कंदील दाखविल्याने हे कार्यालय उभारण्याचा मार्ग मोकळा झाला होता. कार्यालयाचा आराखडा तयार केला असून याची तांत्रिक मंजुरी घेऊन या बांधकामाची निविदा प्रक्रिया सुरू करून येत्या दीड ते दोन वर्षांत याचे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता प्रशांत ठाकरे यांनी सांगितले आहे.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The work plan of the office at gokhivare in vasai is ready amy
First published on: 27-09-2022 at 00:03 IST