वसई: व्हॅलेन्टाईन डे ला प्रेयसीला भेट देण्यासाठी एका २३वर्षीय तरुणाने महागडय़ा वाहनांची चोरी केली आहे. या आरोपीला व्हॅलेन्टाईन डेच्या पूर्व संध्येलाच माणिकपूर पोलिसांनी अटक केली आहे. अटक आरोपीकडून ५  दुचाकी हस्तगत केल्या आहेत.

वसई, विरार शहरात वाहनचोरीच्या  घटना समोर येत आहेत. नुकताच नायगाव पश्चिम परिसरात दुचाकी चोरी झाल्याची घटना घडली होती.  याप्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. सातत्याने अशा घटना समोर येत असल्याने वरिष्ठांनी दिलेल्या सुचनेनुसार माणिकपूर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने तपास सुरू केला होता.

hotel Solapur district
सोलापूर : हॉटेल व्यवस्थापनाच्या नावाखाली मित्राला ६८ लाखांचा गंडा, अक्कलकोटमध्ये दागिने लंपास
how to use coconut oil
पांढऱ्या केसांपासून सुटका मिळवण्यासाठी ‘हे’ तेल वापरून पाहा, तेलात फक्त मेथी दाणे टाकून करा केसांची मालिश
AJIT PAWAR AND BUDGET
सौर कृषीपंप ते कृषी महाविद्यालयास मान्यता, अंतरिम अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी नेमकं काय? वाचा…
promote electric vehicles in India
भारतात इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी तीन प्रस्ताव, कोणता ठरणार फायदेशीर?

बातमीदाराने दिलेल्या माहितीवरून माणिकपूर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. सदर आरोपीचे नाव चंद्रेश पाठक (२३) असून त्याच्याकडून तीन लाख ९० हजार रुपये किमतीच्या पाच दुचाकी हस्तगत केल्या आहेत. अटक केलेल्या आरोपीची चौकशी केली असता  व्हॅलेन्टाईन डेच्या दिवशी प्रेयसीला भेट देण्याच्या उद्देशाने वाहन चोरी करीत असल्याची कबुली दिली आहे. १४ फेब्रुवारीला प्रेयसीसोबत व्हॅलेन्टाईन डे साजरा करण्याच्या  पूर्वसंध्येलाच पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे, अशी माहिती माणिकपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपतराव पाटील यांनी दिली. कामगिरी परिमंडळ-३ पोलीस उपायुक्त सुहास बावचे, साहाय्यक पोलीस आयुक्त पद्मजा बडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने केली आहे.