वसई- विरार गुरूवारी दुपारी रिक्षातून आलेली लोकं चॉकलेट वाटून मुलं पळवित असल्याचा प्रकार अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे. विरार पोलिसांनी अवघ्या काही तासात या प्रकरणाचा उलगडा केला आहे. रिक्षातून आलेले ते लोकं आईच्या दशक्रिया निमित्त मुलांना चॉकटेल वाटत होते..मात्र लोकांचा गैरसमज झाल्याने ही अफवा पसरली होती..

हेही वाचा >>> वसई : सांडपाणी आणि पाणी वितरणासाठी एक हजार कोटी ; केंद्र शासनाकडून निधी मंजूर

Gajlaxmi Rajyog
येत्या ७ दिवसांनी ‘या’ राशींचे येणार चांगले दिवस? ‘शुभ योग’ बनल्याने लक्ष्मी कृपेने बँक बँलेन्समध्ये झपाट्याने होऊ शकते वाढ
Pimpri chinchwad, Shocking Murder Unveiled, Drunk female friend Advantage, suicide, murder, suicide turn murder, murder in pimpri, crime in pimpri, police, marathi news, post mortem report
पुणे: मद्यधुंद मैत्रिणीचा गैरफायदा घेऊन ठेवले शारीरिक संबंध; मानलेल्या भावाने केली ‘त्याची’ हत्या
nia denies allegations of unlawful actions in bengal s bhupatinagar
छाप्यांमागे दुष्ट हेतू नाही! आरोपीच्या पत्नीच्या तक्रारीनंतर ‘एनआयए’चा खुलासा
Mentally retarded girl pregnant from sexual abuse crime was solved with the efforts of Bharosa Cell
लैंगिक अत्याचारातून मतीमंद मुलगी गर्भवती; भरोसा सेलच्या प्रयत्नाने उलगडला गुन्हा

गेल्या काही दिवसांपासून मुलं पळविणारी टोळी सक्रीय असल्याच्या अफवा पसरत असल्याने पालक आणि विद्यार्थ्यांंमध्ये घबराट पसरली आहे. गुरूवारी दुपारी विरार मध्ये घडलेल्या एका घटनेने भर पडली. दुपारी एकच्या सुमारास विरार पश्चिमेच्या उंबरगोठण येथे एक रिक्षा येऊन थांबली. या रिक्षात एका इसमासह दोन महिला होत्या. त्यांनी रस्त्यावरून जाणार्‍या एका शाळकरी मुलीला थांबवून तिला चॉकलेट देऊ केले. आधीच मुलं पळविण्याची अफवेमुळे घाबरलेली मुलगी या प्रकाराने अधिक घाबरली आणि तिने पळ काढला. या प्रकाराने परिसरात एकच घबराट पसरली होती. हा प्रकार एका स्थानिकाने पाहिला आणि मुलं पळविणारी टोळी आल्याची माहिती पोलिसांच्या नियत्रण कक्षाला दिली.

पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी घटनेचे गांभिर्य ओळखून पोलीस उपायुक्त प्रशांत वाघुंडे यांना चौकशीचे आदेश दिले. पोलिसांनी कसून तपास करून ती रिक्षा शोधून काढली. पुढील चौकशीत ही घटना अफवा असल्याचे निष्पन्न झाले. विरारच्या विरार नगर मध्ये राहणार्‍या एका महिलेचे १३ सप्टेंबर रोजी निधन झाले होेते. गुरूवारी त्यांचे कुटुंबिय अर्नाळा येथे दशक्रिया विधी करण्यासाठी गेले होते. या महिलेला चॉकलेट आवडत होती. त्या मुलांना नेहमी भेटवस्तू देत होत्या. त्यामुळे आईच्या आठवणी निमित्ता त्यांच्या मुलांनी चॉकलेट वाटण्यास सुरवात केली होती. परंतु नेमकं लोकांना मुलं पळविणारी टोळी आल्याचा गैरसमज झाला आणि गोंधळ उडाला होता.

आम्ही रिक्षाचालक आणि त्या मध्ये असलेल्या तिघांचा चौकशी केली. आईच्या आठणीनिमित्त ते चॉकलेट वाटत होते. यामध्ये कुठलाही दुसरा उद्देश नसल्याचे उपायुक्त वाघुंडे यांनी सांगितले.संपूर्ण वसई विरार आणि मीरा भाईंदर शहरात मुलं पळविणारी एकही घटना घडली नाही. विरार मधील घटना देखील अफवा होती. नागरिकांनी घाबरून न जाता अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी केले आहे