वसई- मित्राच्या मुलीसह तिच्या दोन मैत्रीणीवर बलात्कार करणार्या आरोपी कमलेश कदम याला विरार पोलिसांनी गुजराथ मधील सुरत येथील अटक केली. त्याला मंगळवारी वसईच्या सत्र न्यायालयात हजर केले असता ५ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
आरोपी कमलेश कदम (४५) हा विरार मध्ये राहतो. त्याचा मित्र तुरुंगात असल्याने त्याने पत्नी आणि मुलीला सांभाळ करण्याची विनंती केली होती. दरम्यान, मुलीची आई घर सोडून गेल्यानंतर पीडित मुलगी एकटीच राहिली. ती एकटी असल्याचा फायदा घेत आरोपी कदम याने तिच्यावर बलात्कार करण्यास सुरावत केली. या मुलीच्या दोन अन्य मैत्रीणींनाही त्याने आपले सावज बनवले. सख्ख्या बहिणी असलेल्या दोन्ही मुली १३ वर्षांच्या आहेत. मागील दिड महिन्यापासून हा प्रकार सुरू होता. याप्रकरणी सोमवारी १३ वर्षाच्या मुलीने विरार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. विरार पोलिसांनी आरोपी कमलेश कदम याच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. मात्र तो फरार होता. विरार पोलिसांच्या पथकाने गुजराथच्या सुरत येथील कदम याला अटक केली. त्याला सोमवारी वसईच्या सत्र न्यायालयात हजर केले असता ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
आरोपी कमलेश कमद याने तिन्ही अल्पवयीन मुलींच्या अज्ञानाता आणि असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन त्यांच्यावर बलात्कार केला आहे. त्याने अन्य मुलींसोबत असा प्रकार केला आहे का त्याची आम्ही चौकशी करत आहोत अशी माहिती विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लालू तुरे यांनी दिली.