मार्चअखेरीस पडदा उघडणार

भाईंदर : मीरा भाईंदर महानगरपालिकेने बांधलेल्या नव्या नाटय़गृहाची पाहणी महाराष्ट्रातील प्रसिद्ध नाटय़ कलाकारांकडून करण्यात आली. येत्या मार्चअखेरीस नाटय़गृह सुरू होईल, असे पालिकेने स्पष्ट केले आहे. दहिसर चेकनाका परिसरात ठाकूर मॉलजवळ मीरा भाईंदर महानगरपालिकेमार्फ़त या नाटय़गृहाची निर्मिती करण्यात येत आहे. साधारण ४० कोटी रुपये या नाटय़गृहाच्या निर्मितीकरिता खर्च होणार आहे. नाटय़गृहाचे भूमिपूजन शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या हस्ते झाले होते. बीओटीह्ण तत्त्वावर हे नाटय़गृह उभारले जात आहे. एका विकासकाने पालिकेला विकास हक्क प्रमाणपत्र  (टीडीआर) घेऊन नाटय़गृहाची इमारत बांधून हस्तांतरित केली आहे. त्यामुळे पालिकेचा पैसा खर्च न होता टीडीआरह्णच्या मोबदल्यात विकासकाने हे नाटय़गृह बांधून दिले आहे.

youth beaten, love jihad
‘लव्ह जिहाद’चा आरोप करून तरुणाला मारहाण… सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्रकार
piyush goyal
कर्तबगारीने ‘तेजांकित’ झालेल्यांचा गौरव!
sangli municipal corporation marathi news
सांगली: महिलेवर अत्याचार करणाऱ्या पालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांना अटक
Udayanaraje Bhosle received a warm welcome in Satara
साताऱ्यात उदयनराजे यांचे जोरदार शक्ती प्रदर्शन; कोणत्याही परिस्थितीत मी निवडणूक लढविणार

या नाटय़गृहाचे काम अंतिम टप्प्यात आले असल्यामुळे त्यात काही आवश्यक बदल अथवा वाढ करण्याच्या दृष्टीने स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांनी महाराष्ट्रातील प्रसिद्ध नाटय़ कलाकारांचा प्रशासकीय पाहणी दौरा शनिवारी आयोजित केला होता. त्यामध्ये भरत जाधव, शरद पोंक्षे, राजन भिसे, सुशांत शेलार आदी कलाकार आणि आमदार प्रताप सरनाईक व पालिका आयुक्त दिलीप ढोले उपस्थित होते. या वेळी कलाकारांनी काही सूचनाही केल्या. दहिसर चेकनाक्यालगतच्या या नाटय़गृहाच्या इमारतीत तळमजला अधिक चार मजले आणि दोन नाटय़गृहे असतील. एक मोठे नाटय़गृह असून त्यात ८६० सीट्स असतील. तर छोटय़ा नाटय़गृहात ३४२ सीट्स असणार आहेत. तिसऱ्या व चौथ्या मजल्यावर आर्ट गॅलरी तयार करण्यात येत आहे.