वसई- नालासोपारा पश्चिमेच्या श्रीप्रस्था येथील रस्त्यावर दुचाकीच्या वाहनला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. बुधवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास हा अपघात घडला. मयत तरुण हे चुलत भाऊ होते. धीरज गोईल (२२) आणि हिरेन घुघल (२३) हे तरुण नालासोपारा पश्चिमेच्या हनुमान नगर परिसरात असेलल्या जय अपार्टमेंट मध्ये रहात होते. हेही वाचा >>> नालासोपारा बनले अमली पदार्थांचे केंद्र; परदेशी व्यक्तीकडून २ कोटींचे अमली पदार्थ जप्त बुधवारी रात्री ते विरारवरून दुचाकीने नालासोपारा येथील घरी येत होते. मध्यरात्री दीडच्या सुमारास त्यांची दुचाकी नालासोपारा पश्चिमेच्य श्रीप्रस्था येथील नवीन रस्त्यावरून जात होते. त्यावेळी एक भरधाव येणार्या वाहनाला त्यांच्या दुचाकीने धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की दोघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताने हनुमान नगर परिसरावर शोककळा पसरली आहे. याप्रकऱणी नालासोपारा पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नालासोपारा पश्चिमेच्या श्रीप्रस्था येथून विरारला जाण्यासाठी नवीन रस्ता तयार करण्यात आला आहे. तेथून वाहने सुसाट वेगाने जात असतात. तेथे सुरक्षेसाठी कुठल्याही उपाययोजना नसल्याने अपघात घडत असतात. त्यामुळे येथे दुभाजक, सिग्नल बसवावे अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.