Two persons arrested in Virar for firing over love affair | Loksatta

विरारमध्ये प्रेमप्रकरणातून गोळीबार; दोन जणांना अटक

विकी पाटील नावाच्या आरोपीने अक्षय पाटील नावाच्या तरुणाला बेदम मारहाण केली. तसेच अक्षयच्या अंगावर बंदूक रोखून हवेत गोळीबारही केला.

विरारमध्ये प्रेमप्रकरणातून गोळीबार; दोन जणांना अटक
विरारमध्ये प्रेमप्रकरणातून गोळीबार (प्रातिनिधिक छायाचित्र)

विरारमध्ये प्रेमप्रकरणातून एका तरुणाला मारहाण करत गोळीबार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मांडवी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. या मारहाणीत अक्षय पाटील हा जखमी झाला आहे. मांडवी पोलिसांनी या प्रकरणी विकी पाटील यांच्यासह दोघांना अटक केली आहे. शनिवारी दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता ३० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

हेही वाचा- नालासोपाऱ्यात बंदुकीच्या धाकावर सराफच्या दुकानात लूट; १५ तोळे दागिने घेऊन आरोपी फरार

नायगाव येथील जूचंद्र गावात राहणाऱ्या अक्षय पाटील आणि विरारच्या फाटा खार्डी येथे राहणाऱ्या विकी पाटील यांच्यात प्रेम प्रकरणावरून वाद होता. शुक्रवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास अक्षय पाटील विरार फाटा येथील कण्हेर येथे आला असतांना त्याला विकी पाटील आणि त्याच्या आठ ते दहा जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केली. यावेळी अक्षयच्या अंगावर बंदूक रोखून हवेत गोळीबार करण्यात आला.

मराठीतील सर्व वसई विरार ( Vasaivirar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-11-2022 at 21:37 IST
Next Story
नालासोपाऱ्यात बंदुकीच्या धाकावर सराफच्या दुकानात लूट; १५ तोळे दागिने घेऊन आरोपी फरार