scorecardresearch

Premium

ट्रक दुचाकी अपघातात दुचाकी चालक जागीच ठार, विरार पूर्वेच्या पारोळ फाटा येथील घटना

विरार पूर्वेच्या शिरसाड- वज्रेश्वरी महामार्गावरील पारोळ फाटा येथे ट्रक व दुचाकीचा भीषण अपघात घडला. यात दुचाकीस्वार जागीच ठार झाला.

Two wheeler driver died Parol Phata
ट्रक दुचाकी अपघातात दुचाकी चालक जागीच ठार, विरार पूर्वेच्या पारोळ फाटा येथील घटना (छायाचित्र – लोकसत्ता टीम/ग्राफिक्स)

वसई : विरार पूर्वेच्या शिरसाड- वज्रेश्वरी महामार्गावरील पारोळ फाटा येथे ट्रक व दुचाकीचा भीषण अपघात घडला. यात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. रविवारी दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली.

विरार पूर्वेच्या भागातून शिरसाड-वज्रेश्वरी महामार्ग गेला आहे. दररोज या रस्त्यावर मोठ्या संख्येने वाहनांची वर्दळ असते. रविवारी दुपारी या मार्गावर हायवा ट्रक आणि दुचाकीचा अपघात घडला. ट्रकचे चाक दुचाकी चालकाच्या अंगावरून गेल्याने दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला.

Traffic jam near Charoti due to concreting work of highway
महामार्गाच्या काँक्रीटीकरण कामामुळे चारोटीजवळ वाहतूक कोंडी, पाच ते सहा किमी वाहनांच्या रांगा
Traffic changes Mumbai-Bangalore bypass
मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर वाहतूक बदल; मुंबईकडे जाणारी एक मार्गिका बंद
accidents Samruddhi highway
समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच, गुरुवारी पहाटे खासगी बसला कंटेनरची धडक
trees cut for cstm redevelopment
सीएसएमटीच्या पुनर्विकासासाठी शेकडो झाडे तोडली जाणार; पालिकेच्या वृक्षप्राधिकरणाकडून नोटीस

हेही वाचा – वसई : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर दहा ठिकाणी पादचारी पूल, रस्ते ओलांडून होणारे अपघात थांबणार; नागरिकांना दिलासा

हेही वाचा – भाईंदर : दुकानावरील इंग्रजी पाट्यांवर मनसे फासले काळे

मारुती तुकाराम गवा (२५) असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकी चालकाचे नाव असून ते विरार पूर्वेच्या बरफपाडा येथे राहणारे आहे. या प्रकरणी मांडवी पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Two wheeler driver died on the spot in truck two wheeler accident incident in parol phata of virar east ssb

First published on: 03-12-2023 at 20:14 IST

आजचा ई-पेपर : वसई विरार

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×