शिवसेनेचा विरोध मावळला, मात्र कार्यकर्ते अडकले

Rana Kapoor gets bail in latest case will be out of jail after four years
राणा कपूर यांना अखेरच्या प्रकरणातही जामीन, चार वर्षांनंतर तुरुंगातून बाहेर पडणार
women office bearers of Thackeray group in Kalyan join Shindes Shiv Sena
कल्याणमध्ये ठाकरे गटाला धक्का, महिला पदाधिकाऱ्यांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश
jitendra kumar trivedi bjp
भाजपाच्या ‘या’ नेत्यावर तृणमूल नेत्यांविरुद्ध कट रचल्याचा आरोप
parbhani lok sabha marathi news, shivsena parbhani lok sabha marathi news, sanjay jadhav parbhani loksabha marathi news
पस्तीस वर्षात ‘धनुष्यबाण’ चिन्हाशिवाय बालेकिल्ल्यातील शिवसेनेची पहिलीच निवडणूक

वसई : व्हॅलेंटाइन डेला शिवसेनेचा विरोध मावळला असला तरी यापूर्वी केलेल्या आंदोलनाची झळ अद्यापही शिवसैनिकांना सहन करावी लागत आहे. २००६ मध्ये नालासोपारा येथे आयोजित एक व्हॅलेंटाइन पार्टी शिवसैनिकांनी उधळून लावली होते. या घटनेला १६ वर्षे उलटून गेली असली तरी अद्यापही या प्रकरणाचा निकाल लागलेला नाही. त्यामुळे या आंदोलनातील ३२ शिवसैनिक अद्यापही न्यायालयाच्या फेऱ्यात अडकले आहेत.

हे प्रकरण देशपातळीवर गाजले होते. याप्रकरणी खुद्द बाळासाहेब ठाकरे यांना ही जाहीर माफी मागावी लागली होती. तरुणींना मारहाण आणि विनयभंग केल्याप्रकरणी ३२ शिवसैनिकांवर  गुन्हे दाखल झाले होते.

या आंदोलनाचे नेतृत्व करणारे शिवसेना तालुकाप्रमुख शिरीष चव्हाण यांनी सांगितले की,  न्यायालयामध्ये सतत तारखा पडत असल्यामुळे या प्रकरणाचा निकाल अद्याप लागलेला नाही. पोलिसांना फिर्यादी सापडत नसल्यामुळे पुढील प्रक्रिया पूर्ण होत नाही. यामुळे अनेक शिवसैनिकांच्या कारकीर्दीला फटका बसला आहे. शिवसेनेचा व्हॅलेंटाइन डेला विरोध मावळला आहे, मात्र आम्ही अद्यापही कायद्याच्या कचाटय़ातून सुटला नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली. या प्रकरणाची पुढील तारीख २४ फेब्रुवारी रोजी आहे