लोकसत्ता प्रतिनिधी

वसई : वाढती प्रवाशांची संख्या लक्षात घेता वसई- भाईंदर रो रो सेवेच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. नवीन सहा फेऱ्या वाढवून आता ९ ऐवजी दिवसाला १५ फेऱ्या केल्या जाणार आहेत. २६ जानेवारीपासून या फेऱ्या सुरू केल्या जाणार आहेत.

mahayuti ncp bjp contest pimpri chinchwad municipal elections
पिंपरी-चिंचवडसाठी महायुतीत चुरस
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
himachal Pradesh balmaifil article
बालमैफल : अद्भुत निसर्ग
namdev shastri dhananjay munde
भगवानगडचे महंत नामदेव शास्त्री यांचा कर्जतमध्ये निषेध
Maharashtra Breaking News Live Updates in Marathi
Maharashtra Breaking News Updates : नामदेव शास्त्रींकडून धनंजय मुंडेंची पाठराखण, बजरंग सोनवणेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कोणाला पाठिंबा…”
Controversy between Marathi and non marathi speakers over Satyanarayan Puja and Haldi Kumku program in society in Dombivli
डोंबिवलीत सोसायटीत सत्यनारायण पूजा, हळदी कुंकु कार्यक्रमावरून मराठी- अमराठी भाषकांमध्ये वाद
mohan bhagwat
एका-दोघांमुळे राष्ट्र मोठे होत नाही- सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
Miraj Sitar, Sitar postage stamp, Sangli ,
सांगली : मिरजेतील सतारीला आता टपाल तिकिटावर स्थान

वसई -भाईंदर या भागातील नागरिकांच्या सोयीसाठी महाराष्ट्र सागरी मंडळातर्फे वसई- भाईंदर दरम्यान रोरो सेवा सुरू करण्यात आली आहे. सुवर्णदुर्ग शिपींग व मरीन सर्दीसेस प्रा. लि. यांच्या मार्फत ही चालविली जात असून या फेरीबोटीची क्षमता ३३ वाहने व १०० प्रवासी अशी आहे. लोकल गाडी मधील वाढती गर्दी, महामार्गावरील वाहतूक कोंडी अशा विविध प्रकारच्या कारणामुळे वसई भाईंदर बहुतांश प्रवासी हे रोरो सेवेने प्रवास करू लागले आहेत.

दिवसेंदिवस रोरो ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत आहे. सद्यस्थितीत एकच फेरी बोट असल्याने दिवसाला ये जा करून ९ फेऱ्या होत होत्या. एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यावर बोट गेल्यानंतर जवळपास ४५ मिनिटे ते १ तास प्रवाशांना वाट बघत राहावे लागत होते. त्यामुळे अनेकदा प्रवासी आलेल्या जागेवरून पुन्हा माघारी जात होते. फेरी बोटींची संख्या वाढविण्यात यावी अशी मागणी ही प्रवाशांकडून करण्यात येत होती.

आता आणखीन एक नवीन बोट वसई भाईंदर या रोरो सेवेत दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे २६ जानेवारी पासून दैनंदिन रोरो फेऱ्यांमध्ये वाढ केली जाणार आहे. सकाळ व सायंकाळ अशा दोन्ही सत्रात नवीन ६ फेऱ्या वाढणार असून दिवसाला ये जा करून १५ फेऱ्या रोरो च्या होणार आहेत. रोरो च्या फेऱ्यांमध्ये वाढ झाल्याने वसई भाईंदर दोन्ही जेट्टीवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ताटकळत उभे न राहता नियोजित वेळेत ही सेवा दिली जाणार आहे अशी माहिती रोरो सेवा व्यवस्थापक यांनी दिली आहे.

अशा आहेत नवीन फेऱ्या

वसई जेट्टीवरून सकाळी ११.१५ वाजता दुपारी १२.४५, ३ वाजता, सायंकाळी ४.३०, ६.०० आणि ७.३० वाजता

तर भाईंदर वरून सकाळी १०.३०, १२.०० वाजता, दुपारी २.१५, ३.४५ आणि संध्याकाळी ५.१५, ६.४५ वाजता

प्रवाशांना दिलासा

रोरो च्या बोटीतून थेट वाहने घेऊन प्रवास करता येत असल्याने अनेक प्रवासी हे रोरो सेवेचा वापर करीत आहेत. विशेषतः सायंकाळी वसईतून भाईंदर व भाईंदर मधून वसई असा प्रवास करणाऱ्या वाहनधारकांची संख्या ही अधिक आहे. आता दोन्ही बाजूने फेरीबोट सुरू राहणार असल्याने प्रवाशांचा ताटकळत राहण्याचा वेळ वाचणार असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

Story img Loader