वसई परिसरात असलेल्या कॉस पॉवर कंपनीला भीषण आग लागली. या आगीत तीन जणांचा मृत्यू तर ७ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. ही आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशामन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

कॉस पॉवर या कंपनीत विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणे तयार केली जातात. मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी २.३० च्या सुमारास या कंपनीतील बॉयरलमध्ये स्फोट झाला. त्यामुळे कंपनीत ही आग लागली. या आगीत तीन ३ कामगारांचा मृत्यू झाला असून, ७ जण जखमी झाले आहेत.

हेही वाचा – राज्याचा सत्तासंघर्ष एक महिना लांबणीवर, पुढील सुनावणी थेट १ नोव्हेंबरला

आगीची माहिती मिळताच तात्काळ अग्निशामन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आता या आगीवर नियंत्रण आणण्याची माहिती मिळत आहे. ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त दिलं आहे.