वसई : मुंबई अहमदाबाद महामार्गावर एका पादचार्‍याला धडक देऊन फरार झालेल्या ट्रकचालकास पेल्हार पोलिसांनी उत्तर प्रदेशातून अटक केली आहे. महामार्गावरील ६० हून अधिक सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस आला आहे. मंगळवार १६ एप्रिल रोजी मुंबई अहमदाबाद महामार्गावरील पेल्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अज्ञात वाहनाने एका ३५ वर्षीय इसमाला धडक दिली होती. जखमी होऊन तो इसम रस्त्यावर पडला होता. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर अज्ञात वाहनचालक फरार झाला होता. याप्रकरणी पेल्हार पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरोदातत कलम ३०४ (अ), २७९, ३३७,३३८ अन्वये गुन्हा दाखल होता. मयताची ओळखही पटलेली नव्हती. मात्र आरोपीला पकडण्यासाठी पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी कंबर कसली. गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने फरार वाहनचालकाचा शोध सुरू केला.

हेही वाचा : पालघर लोकसभेसाठी बविआने कंबर कसली, प्रत्येक कार्यकर्त्याने उमेदवार समजून कामाला लागण्याचे आदेश

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vasai pelhar police arrest hit and run case truck driver in punjab inspected 60 cctv camera on highway css
First published on: 20-04-2024 at 17:27 IST