वसई: वसई पूर्व येथील एका नामांकित खासगी शाळेत मंगळवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली आहे. शाळेच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने १५ वर्षांची दहावीतील विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली आहे. तिच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली असून, तिच्यावर वसईतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शाळा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ही विद्यार्थिनी दुसऱ्या मजल्यावरून खाली पडली. मात्र, वर्ग (क्लासेस) सुरू असतानाच तिने दुसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, या घटनेबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळाली नसल्याचे आचोळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजितकुमार पवार यांनी सांगितले. तर कोणीही याची तक्रार करण्यासाठी पुढे आले नसल्याचे ही पोलिसांनी सांगितले.
