वसई : वसई विरार आणि मिरा भाईंदर शहरात अल्वपयीन मुलींच्या लैंगिक अत्याचार आणि विनयभंगाच्या ४ घटना घडल्या आहेत. एकाच दिवसात विविध पोलीस ठाण्यात यासंदर्भात पोक्सो अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिल्या घटनेत नालासोपारा पूर्वेला रहात असलेल्या १४ वर्षीय मुलीचा तिच्याच पित्याने विनयभंग केला आहे. २०२३ मध्ये देखील त्याने आपल्या मुलीचा विनयभंग केला होता. काल त्याने पुन्हा मुलीशी अश्लील वर्तन केले. त्यामुळे तिने हा प्रकार आपल्या आईला सांगितला. याप्रकरणी आचोळे पोलीस ठाण्यात तिच्या वडिलांविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरी घटना वसई पूर्वेच्या कामण येथे घडली आहे. ११ वर्षीय मुलीला रस्त्यावर विक्री करणार्‍या तरुणाने पाठलाग करून तिच्याशी गैरकृत्य केले. तिला त्याने रस्त्यात अडवून चाकूने मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Woman killed due to family dispute in Pune news
कौटुंबिक वादातून महिलेचा खून; सहा वर्षांच्या मुलाला घेऊन पती पसार
bigg boss 18 advocate Gunaratna sadavarte entry with pet donkey max in salman khan show watch promo
Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंची शोमध्ये एन्ट्री,…
In Badlapur case accused Akshay Shinde Thane alleged encounter
चकमकी अखेर पोलिसांवरच का शेकतात?
High Court comment on Badlapur sexual assault case accused Akshay Shinde encounter Mumbai
हे एन्काउंटर नव्हे! उच्च न्यायालयाची टिप्पणी; थेट डोक्यात गोळी झाडण्याच्या कृतीवरही बोट
navi mumbai police registered case under pocso act against youth for child sexual abuse
नवी मुंबई : बाल लैंगिक अत्याचारप्रकरणी तरुणावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा
student wing agitation
‘वंचित’कडून महाविकास आघाडी समर्थक विचारवंत लक्ष्य
Murder of petrol pump owner of Virar two accused arrested by crime branch team
विरारच्या पेट्रोलपंप मालकाची हत्या, गुन्हे शाखेच्या पथकाकडून दोन आरोपींना अटक
Girls, hotel room, meet friend, High Court,
मुलींनो, मित्राला भेटायला थेट हॉटेलच्या खोलीत जाऊ नका.. उच्च न्यायालयाचा सल्ला!

हेही वाचा…प्रवीण धुळे हत्या प्रकरण फरार आरोपीला १६ वर्षानंतर अटक

मिरा रोड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात शौर्य अवस्थी या आरोपीने १७ वर्षीय भर रस्त्यात हात पकडून तिचा विनयभंग केला. माझे वडील पोलीस खात्यात असून मी तुझ्या आईवडिलांना खोट्या गुन्ह्यात अडकवेन, अशी धमकी दिली. या प्रकरणी मिरा रोड पोलिसांनी त्याच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. भाईंदर मध्ये २० वर्षीय तरुणी रिक्षाची वाट बघत असताना रस्त्यात तिचा विनयभंग करून पळू गेला. याप्रकरणी भाईंदर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.