वसई : वसई विरार आणि मिरा भाईंदर शहरात अल्वपयीन मुलींच्या लैंगिक अत्याचार आणि विनयभंगाच्या ४ घटना घडल्या आहेत. एकाच दिवसात विविध पोलीस ठाण्यात यासंदर्भात पोक्सो अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिल्या घटनेत नालासोपारा पूर्वेला रहात असलेल्या १४ वर्षीय मुलीचा तिच्याच पित्याने विनयभंग केला आहे. २०२३ मध्ये देखील त्याने आपल्या मुलीचा विनयभंग केला होता. काल त्याने पुन्हा मुलीशी अश्लील वर्तन केले. त्यामुळे तिने हा प्रकार आपल्या आईला सांगितला. याप्रकरणी आचोळे पोलीस ठाण्यात तिच्या वडिलांविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरी घटना वसई पूर्वेच्या कामण येथे घडली आहे. ११ वर्षीय मुलीला रस्त्यावर विक्री करणार्या तरुणाने पाठलाग करून तिच्याशी गैरकृत्य केले. तिला त्याने रस्त्यात अडवून चाकूने मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
हेही वाचा…प्रवीण धुळे हत्या प्रकरण फरार आरोपीला १६ वर्षानंतर अटक
मिरा रोड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात शौर्य अवस्थी या आरोपीने १७ वर्षीय भर रस्त्यात हात पकडून तिचा विनयभंग केला. माझे वडील पोलीस खात्यात असून मी तुझ्या आईवडिलांना खोट्या गुन्ह्यात अडकवेन, अशी धमकी दिली. या प्रकरणी मिरा रोड पोलिसांनी त्याच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. भाईंदर मध्ये २० वर्षीय तरुणी रिक्षाची वाट बघत असताना रस्त्यात तिचा विनयभंग करून पळू गेला. याप्रकरणी भाईंदर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.