निसर्ग संपन्न असलेल्या वसई-विरारच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी व येथील परीसर विकसित होण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना व प्रकल्प आखले जात आहेत. मात्र प्रत्यक्षात प्रकल्प मार्गी लावण्यासाठी शासनाच्या उदासीनतेमुळे शहरातील पर्यटन विकासाच्या दृष्टीने महत्वाचे असलेले अनेक प्रकल्प रखडले आहेत.

वसई विरार शहर म्हटले की हिरवागार निसर्ग, फळबागा, विस्तीर्ण समुद्रकिनारा, डोंगररांगा, बावखले, सुंदर तलाव असे चित्र समोर येते. मात्र मागील काही वर्षांमध्ये वसई-विरार शहरात झपाट्याने नागरीकरण वाढू लागले आहे. बुलेट ट्रेन, कॉरिडॉर यासह अन्य मोठे प्रकल्प या शहरातून जात आहेत. तर दुसरीकडे सिमेंट काँक्रीटची जंगले झपाट्याने वाढत आहेत. मात्र शहरात पर्यटन स्थळे विकसित करण्याकडे मात्र कानाडोळा झाला आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

वसईचा ऐतिहासिक किल्ला, अर्नाळ्यातील जलदुर्ग, पश्चिम पट्ट्यात असलेली पुरातन चर्चेस, जीवदानी मंदिर, समुद्रकिनारे, तुंगारेश्वर अभयारण्य, समुद्राच्या पाण्याने वेढलेली बेटे असे बरेच काही वसईत पाहण्यासारखे आहे. मात्र या पर्यटनस्थळांची माहिती वसई बाहेरील पर्यटकांना अजून हव्या त्या प्रमाणात झाली नाही. ती झाल्यास बाहेरचे पर्यटक वसईत येऊ शकतात.

हेही वाचा : वसई : मृत्यूच्या दाढेतून चिमुकली दिपिका सुखरूप आली घरी

वसईतील पर्यटन स्थळांचा विकास करणार, असे वेळोवेळी शासनस्तरावरून सांगितले जाते, मात्र प्रत्यक्षात आतापर्यंत पर्यटनस्थळांच्या विकासाला चालना मिळालेली नाही. नालासोपारा पश्चिमेच्या सोपारा येथे अडीच हजार वर्षांपूर्वीचा बौद्ध स्तूप आहे. शूपार्पक (आताचे सोपारा) ही पूर्वी कोकण प्रांताची राजधानी होती. येथील बंदरातून व्यापार चालायचा. अडीच हजार वर्षांपूर्वी चंदनाचे व्यापारी आणि नंतर तथागत भगवान बुद्धाच्या धम्माने प्रेरित होऊन अरहंत पद प्राप्त झालेले बौध्द भिक्खू पूर्ण यांनी हे बौद्ध स्तूप बांधून भगवान गौतम बुद्ध यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन केले होते. त्यामुळे या स्तूपाला धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे.

जगभरातील बौद्ध धम्माचे अनुयायी आणि पर्यटक या स्तूपाला भेट देण्यासाठी येत असतात. परंतु या स्तूपाच्या विकासाकडे फारसे लक्ष दिले जात नसल्याने त्यांची अवस्था बिकट आहे. या स्तूपाचे संवर्धन विकसित करण्यासाठी योजना आखल्या आहेत. परंतु त्यावर अमल होत नसल्याने विकास साधणार तरी कसा, प्रश्न उपस्थित होत आहे.

तसेच दुर्ग मित्रांना स्वच्छता मोहिमेदरम्यान विविध प्राचीन शिळा, अवशेष आढळून येतात. अशा प्राचीन वस्तूंचे जतन व्हावे यासाठी वास्तू संग्रहालय तयार करून त्यात ठेवल्या जाणार होत्या. ते काम आजही मार्गी लागले नाही. दुसरीकडे वसई तालुक्याच्या पर्यटन क्षेत्राला चालना मिळावी यासाठी पर्यटनस्थळ नीती आयोगाने पहिल्या टप्यात देशातील १ हजार ३८२ बेटांमधुन २६ बेटांची निवड केली आहे. त्या २६ बेटांमधे वसईतील पाणजू बेटाचा समावेश केला होता. या बेटाचा विकास हा बेट समग्र विकास (होलिस्टिक डेव्हलपमेंट ऑफ आयलंड्स प्रोग्राम) या अंतर्गत केला जाणार होता. सहा ते सात वर्षे उलटून गेली अजूनही या बेटाच्या विकासासाठी हालचाली होत नसल्याने या भागाच्या विकास रखडला आहे.

हेही वाचा : ‘ठाकूर’शाही संपवण्यासाठी दुबे प्रकरणाचा वापर; विधानसभेतील विजयानंतर आता पालिकेच्या नियंत्रणासाठी भाजपची व्यूहरचना

विरार पश्चिमेच्या जंजिरे अर्नाळा किल्ल्याला ऐतिहासिक वारसा आहे. या किल्ल्यात जाण्यासाठी बोटीने प्रवास करावा लागतो. जेट्टी नसल्याने गुडघाभर पाण्यात उतरून बोटीने धोकादायक प्रवास करून जावे लागत आहे. त्यामुळे या भागातील किल्ला पाहण्यासाठी जास्त कोणी जात नाही. त्या भागात सुखकर प्रवास करण्यासाठी अर्नाळा किनाऱ्यावर जेट्टी तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. त्या कामाला गती मिळत नसल्याने जेट्टी गेल्या सहा-सात वर्षांपासून रखडली आहे. त्यामुळे पर्यटनाला चालना मिळणार तरी कशी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मागील दीड ते दोन वर्षांपासून विरारच्या मारंबळपाडा हा परिसर कांदळवन संवर्धन व पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मोठा गाजावाजा करीत येथील निसर्ग पर्यटनाची घोषणा शासन स्तरावरून झाली होती. मात्र जनजागृतीचा अभाव व पर्यटकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने सद्यास्थितीत हे पर्यटन माहिती केंद्र अडगळीत सापडले आहे. शहराच्या पर्यटनाला चालना देणारे असे अनेक प्रकल्प घोषणे नंतर अडगळीत जाऊन पडले असल्याचे चित्र वसई-विरार शहरात दिसून येत आहे.

हेही वाचा : वसईत सिमेंट कारखाने व रेडिमिक्स वाहतुकीमुळे प्रदूषण वाढले

प्रत्यक्षात कृतीची गरज

● पर्यटन क्षेत्रात रोजगार निर्मितीची मोठी क्षमता आहे. पर्यटन क्षेत्राच्या जोरावर कोणत्याही देशातील व त्या भागातील आर्थिक स्थिती सुधारु शकते. याशिवाय तेथील राहणीमानाचा दर्जा ही उंचावू शकतो. नैसर्गिक सौदर्य, संस्कृती पाहण्यासाठी देशाच्या, राज्याच्या विविध भागांत लोकांनी जावं म्हणून पर्यटन विकास प्रकल्प महत्त्वाचे ठरतात. मात्र वसई-विरार शहरात पर्यटन क्षेत्र असून ते विकसित केले जात नाहीत.

● याबाबत शासनाची उदासीनता दिसून येत आहे. टोलेजंग इमारती बांधणे म्हणजे शहराचा विकास होत नाही तर तेथील पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे व तेथील संस्कृतीशी निगडित असलेल्या वास्तूंची जोपासना होणे ही महत्त्वाचे आहे. निवडणुकीत केवळ पर्यटन विकासाच्या घोषणा जाहीरनाम्यात दिसतात. परंतु प्रत्यक्षात सत्यात उतरविण्यासाठीच्या हालचाली मात्र शून्य आहेत. शहरातील संस्कृती, निसर्ग, ऐतिहासिक वारसा यांची जोपासना करायची असेल आता घोषणा करून चालणार नाही तर प्रत्यक्षात कृती हवी

Story img Loader