वसई:- वसई-विरार शहरातील ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती, कर्करोग पीडित आणि रक्तशुद्धीकरण (डायलिसिस) रुग्ण या नागरिकांसाठी महापालिकेकडून मोफत परिवहन सेवा दिली जाते. प्रवास नोंदणीसाठी ३१ मे पर्यँतची मुदत दिली होती. या मुदतीत १५ हजार ८७२ इतक्या प्रवाशांची सवलत बस प्रवसासाठी नोंदणी झाली आहे.
वसई-विरार शहरात महापालिकेच्या परिवहन विभागाकडून सार्वजनिक वाहतूक सेवा पुरवली जाते. सद्यस्थितीत परिवहन विभागाच्या ताफ्यात १२० बसेस उपलब्ध असून त्या शहरातील ३६ मार्गांवर धावत आहेत. दररोज या बसेसमधून सुमारे ६० ते ६५ हजार प्रवासी प्रवास करतात. या प्रवाशांमध्ये पालिकेच्या मोफत प्रवास योजनेचा लाभ घेणाऱ्या घटकांचाही समावेश आहे. या लाभार्थ्यांना महापालिकेकडून नोंदणी करून विशेष पास उपलब्ध करून दिले जातात.
तांत्रिक अडचणी आणि कागदपत्रांची जुळवाजुळव करताना अनेक लाभार्थ्यांना अडचणी निर्माण झाल्याने ३१ मे पर्यँत अर्ज सादर करण्याची मुदत दिली होती. या मुदतीदरम्यान जवळपास १५ हजार ८७२ इतक्या प्रवाशांनी नोंदणी केली असल्याची माहिती परिवहन विभागाने दिली आहे. या कल्याणकारी योजनेसाठी महापालिकेच्या तिजोरीतून वर्षाला सुमारे २१ कोटी रुपयांचा निधी खर्च केला जातो. चालू वर्षात आतापर्यंत १५,८७२ लाभार्थ्यांची नोंदणी झाली असून उर्वरित नागरिकांसाठी नोंदणी प्रक्रिया अजूनही सुरू असल्याची माहिती परिवहन व्यवस्थापक धैर्यशील जाधव यांनी दिली.
नोंदणीत घट
वसई-विरार शहरात परिवहन बस सेवेच्या या सवलतीचा लाभ घेण्यासाठी दरवर्षी सरासरी १९ ते २० हजार लाभार्थी नोंदणी करतात. मात्र यावर्षी दोन वेळा मुदत वाढ दिल्यानंतर ही सवलत प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली नाही. आतापर्यंत केवळ साडे पंधरा हजार प्रवाशांची नोंदणी झाली आ
