वसई : पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या वसईकरांना पुढील वर्षी म्हणजे मार्च २०२३ मध्ये पाणी मिळणार असल्याचे पालिकेने जाहीर केले आहे. एमएमआरडीएतर्फे सूर्या पाणी प्रकल्पातील अतिरिक्त १८५ दशलक्ष लिटर्स पाणी शहराला दिले जाणार आहे. ते काम तसेच शहरातील अंतर्गत पाणी वितरण व्यवस्थेचे काम अंतिम टप्प्यात असल्याने वसईकरांचा पाणी प्रश्न मार्च २०१३ मध्ये सुटणार आहे. 

वसई, विरार शहराला २३० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होत असला तरी वाढत्या लोकसंख्येमुळे हे पाणी पुरेसे नव्हते. त्यामुळे शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात असून अनेक भागातील नागरिकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. यासाठी २०१७ मध्ये एमएमआरडीएकडून सूर्या प्रादेशिक पाणी प्रकल्पातून वसईला १८५ दशलक्ष लिटर पाणी देण्याची योजना तयार कऱण्यात आली होती. परंतु त्याचे काम लांबले होते. सुमारे तेराशे कोटी रुपयांच्या या योजनेतून वसई विरार शहराच्या वेशीपर्यंत १८५ दशलक्ष लिटर पाणी देण्यात येणार आहे. परंतु हे पाणी शहरात वितरित कऱण्यासाठी पालिकेला स्वतंत्र वितरण व्यवस्था उभारावी लागणार होती. त्यामुळे महापालिकेने  १३९ कोटीं रुपयांची अमृत योजना मंजूर करून कामाची सुरुवात केली होती. योजनेतून शहरात २८४ किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्या आणि  १८ ठिकाणी जलकुंभ उभारणी करण्याचे  काम हाती घेतले आहे. हे जलकुंभ हे दीड ते दोन दशलक्ष लिटर (एमएलडी ) क्षमतेचे आहेत. आता या जलकुंभांचे काम अंतिम टप्प्यात आहे. येत्या दोन ते तीन महिन्यांत या जलकुंभाचे काम पूर्ण होणार असल्याची माहिती पालिकेचे उपायुक्त (पाणीपुरवठा) तानाजी नरळे यांनी दिली. अमृत योजनेअंतर्गत कामाचा आढावा पालिका आयुक्त अनिलकुमार पवार नियमित घेत आहेत. त्यांच्या पाठपुराव्यामुळे कामाला गती मिळाली असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली आहे. मध्यंतरी ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे अमृत योजनेचे काम रखडले होते. त्यामुळे पालिकेने ठेकदार बदलून नवीन ठेकेदाराची नियुक्ती केली आणि काम पूर्ण केले आहे.

jayant patil praful patel
“शरद पवार भाजपाबरोबर येण्यास ५० टक्के अनुकूल होते”, पटेलांच्या दाव्यावर जयंत पाटील म्हणाले, “त्यांना पक्षसंघटना…”
narendra modi sanjay singh
“तोट्यातल्या कंपन्यांकडून भाजपाला कोट्यवधींचं दान, काही कंपन्यांकडून नफ्याच्या ९३ पट देणग्या”, निवडणूक रोख्यांवरून आपचे गंभीर आरोप
380 crore fraud case
३८० कोटी फसवणूक प्रकरण : आरोपीचा तीन राज्यांमध्ये १२ दिवस पाठलाग, अखेर उत्तराखंड येथून अटक
Sonam Wangchuk
“मी पुन्हा येईन!” २१ दिवसांनी सोनम वांगचूक यांनी उपोषण घेतलं मागे, मोदी आणि शाहांचं नाव घेत म्हणाले…

शहरात आणलेले पाणी साठविण्यासाठी जलकुंभाची आवश्यकता आहे. त्यामुळे ते महत्त्वाचे काम करण्यावर पालिकेने भर दिला होता. पाणी योजनेचे काम आणि वितरणाचे काम अंतिम टप्प्यात आल्याने पालिकेने स्थगित केलेली नळजोडणी प्रक्रिया देखील सुरू केली आहे. मात्र मार्च २०१३ मध्ये पाणी आल्यानंतरच नवीन नळ जोडण्या दिल्या जातील असे पालिकेने स्पष्ट केले.

१७ ठिकाणी जलकुंभ

विरार येथील सहकार नगर, दिवेकर रुग्णालय, विवा कॉलेज, याझू पार्क, गोकुळ धाम, विवा जांगीड, नालासोपारा येथील मारेगाव, सोपारा गाव, यशवंत गौरव, तर वसईतील वसंत नगरी, मधुबन, तामतलाव, गोखिवरे, वालीव, एव्हरशाईन, दत्तानी मॉल या १७ ठिकाणी हे जलकुंभ उभारण्यात आले आहेत. त्यातील गोकुळ कॅम्प, वालीव इंडस्ट्री आणि याझू पार्क येथील ३ मोठय़ा जलकुंभांचे काम पूर्ण होत आल्याची माहिती उपायुक्त नरळे यांनी दिली.