वसई : सूर्या पाणी प्रकल्पातून वसई- विरार महापालिकेला १८५ दशलक्ष लिटर पाणी मिळण्याचे काम अंतिम टप्प्यात आल्याने पालिकेने थांबवलेली नळजोडणी प्रक्रिया सुरू केली आहे. चालू आर्थिक वर्षांचा मालमत्ता कर भरल्यानंतर अर्जदारांची प्रतीक्षायादी तयार करून नळजोडणी देण्यास सुरुवात केली जाणार आहे. नळजोडणी नसल्याने टँकरच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या वसईकरांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वसई विरार महापालिका क्षेत्रास सूर्या, उसगाव पेल्हार या पाणीपुरवठा योजनेतून २०१७ पूर्वी केवळ १३० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येत होता. २०१८ नंतर महापालिकेला सूर्या प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्या अंतर्गत १०० दशलक्ष लिटर्स अधिक पाणीपुरवठा सुरू झाला. शहराचा एकूण पाणीपुरवठा २३० दशलक्ष लिटर्सवर गेला. त्यामुळे महापालिकेने १९ डिसेंबर २०१८ रोजी महासभेत मागेल त्याला नळ जोडणीचा प्रस्ताव एकमताने मंजूर केला होता. या निर्णयामुळे इतकी वर्षे पाण्यापासून वंचित राहिलेल्या अनधिकृत इमारतींनाही नळजोडण्या देण्याचा मार्ग मोकळा झाला होता. २०१९ मध्ये १० हजाराहून अधिक अर्ज महापालिकेला प्राप्त झाले. त्यातील ६ हजार ०५६ जोडण्या दिल्या होत्त्या. मात्र नंतर विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे नळजोडण्याचे काम थांबले होते.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vasaikars get new plumbing three years decision vasai virar municipal corporation ysh
First published on: 10-11-2022 at 00:02 IST