मीरा-भाईंदर महापालिकेचा अग्निशमन विभाग अधिक बळकट

भाईंदर : मीरा-भाईंदर महापालिकेने अग्निशमन विभागाला बळकटी देण्यासाठी नऊ अत्याधुनिक वाहने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या वाहनांची किंमत १५ कोटी रुपये एवढी आहे. दुसरीकडे, चालू आर्थिक वर्षांत पालिकेने अग्निशमन सुरक्षा कराचीदेखील २४ कोटी रुपये एवढी विक्रमी वसुली केली आहे.

port at vadhvan, vadhvan,
वाढवण येथील पर्यावरणस्नेही बंदराचा मार्ग मोकळा
illegal constructions thane marathi news
ठाण्यात बेकायदा बांधकामांवर १५ एप्रिलपासून कारवाई, ठाणे महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना आदेश
Slum cleaning contract
झोपडपट्टी स्वच्छता कंत्राट : चौथ्यांदा मुदतवाढीची नामुष्की, १५ एप्रिलला न्यायालयात सुनावणी
High Court restrains demolition of loom department in Mafatlal
मफतलालमधील यंत्रमाग विभाग पाडण्यास उच्च न्यायालयाचा मज्जाव

शहरातील आगीचा धोका टाळण्यासाठी  महापालिकेने विविध उपाययोजना सुरू केल्या असून अग्निशमन यंत्रणा अधिक बळकट करण्यास सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून पालिकेने आणखी नऊ अत्याधुनिक वाहने घेतली आहे. त्यात २ ‘मल्टिपल फायर टेंडर विथ बूम’, चार ‘मिनी वॉटर टेंडर’ आणि  तीन ‘रेग्युलर फायर टेंडर’ आदी वाहनांचा समावेश आहे. या नव्या वाहनांमुळे आगीच्या घटनांवर लवकर नियंत्रण आणता येईल आणि पालिकेच्या अग्निशमन विभागाची क्षमता वाढेल, असा विश्वास पालिकेने व्यक्त केला आहे.

आगीचा धोका कमी करण्यासाठी  शहरातील सर्व आस्थापनांना अग्निसुरक्षा लेखापरीक्षण करण्याच्या नोटिसा  बजावल्या आहेत. रुग्णालयांच्या सुरक्षेसाठी सर्व १६२ खासगी आणि पालिका रुग्णालयांची अग्निसुरक्षा, विद्युत  आणि बांधकामांचे दर्जा तपासणारे संरचनात्मक लेखापरीक्षण पूर्ण करण्यात आले आहे. यामुळे रुग्णालयांना तिहेरी सुरक्षा कवच प्राप्त झाले आहे.