शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर ; बसचालकांकडून नियमांचे उल्लंघन सुरूच

बुधवारी नायगाव पूर्वेच्या भागात शाळकरी मुलांना घेऊन जाणारी बस ही एका बाजूला कलंडली होती.

शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर ; बसचालकांकडून नियमांचे उल्लंघन सुरूच
(संग्रहित छायाचित्र)

वसई :  वसई, विरार शहरात विविध ठिकाणच्या भागात आजही शालेय विद्यार्थ्यांच्या बसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी बसवून वाहतूक केली जात आहे. बुधवारी नायगाव पूर्वेच्या भागात शाळकरी मुलांना घेऊन जाणारी बस ही एका बाजूला कलंडली होती. या घडलेल्या प्रकारामुळे पुन्हा शाळकरी मुलांच्या सुरक्षित वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

करोना काळात शाळा बंद होत्या आता शाळा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी वाहनेही सुरू झाली आहेत.  आजही शहरात विविध ठिकाणच्या भागात नियमांचा भंग करून क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची ने-आण केली जाते. याशिवाय  अग्निशमन सुरक्षा यंत्रणाबाबतच्या नियमाकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.  नुकताच नायगाव पूर्वेच्या टिवरी फाटा येथे शाळकरी मुलांना घेऊन जाणारी बस कलंडली होती. सुदैवाने ही बस खाली कोसळली नसल्याने मोठी दुर्घटना टळली. स्थानिकांच्या मदतीने आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्याचे दरवाजे उघडून विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आले. या घडलेल्या घटनेमुळे पुन्हा एकदा शहरात शाळकरी मुलांच्या सुरक्षित वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे.  यासाठी शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बसेस व इतर गाडय़ा यांचे वैध विमा प्रमाणपत्र,  वाहन योग्यता प्रमाणपत्र, चालक-मदतनीस, आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्याचे मार्ग इत्यादी बाबींची तपासणी करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

शहरात शालेय वाहतूक करणाऱ्या ६७० बसेसची परिवहन विभागाकडे नोंदणी करण्यात आली आहे. त्यांची वेळोवेळी तपासणी ही केली जात आहे. आता पुन्हा एकदा, क्षमतेपेक्षा अधिक वाहतूक, वैधता प्रमाणपत्र यासह इतर सर्व बाबींची तपासणी केली जाणार असल्याचे उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी प्रवीण बागडे यांनी सांगितले आहे.

शाळा सुरू होताच विरार वाहतूक शाखेच्या अंतर्गत येणाऱ्या शाळा व विद्यार्थ्यांना वाहतूक करणारे बस चालक – मालक यांना सुरक्षेच्या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले आहे. तरीही जर नियमांचे उल्लंघन केले जात असेल त्यावर कारवाई करण्यात येईल, असे विरार वाहतूक शाखेचे वाहतूक पोलीस निरीक्षक दादाराम कारंडे यांनी सांगितले आहे.

वसई वाहतूक पोलीस शाळांना भेटी देणार

शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतूक  सुरक्षेच्या अनुषंगाने नुकताच वाहतूक विभाग, परिवहन विभाग व शिक्षण विभाग यांची बैठक पार पडली आहे. शालेय विद्यार्थ्यांची बसगाडय़ा व व्हॅनमधून वाहतूक काही ठिकाणी नियमबाह्य पद्धतीने वाहतूक होत असते त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. यासाठी आता वसई वाहतूक विभागाकडून कार्यक्षेत्रातील शाळांना भेटी देण्यात येणार आहे. यामध्ये शालेय विद्यार्थ्यांची होत असलेल्या वाहतूक गाडय़ा, त्याला कोण कोणत्या परवानग्या आहेत.  विद्यार्थ्यांची  काळजी घेतली जाते की नाही यासह इतर बाबींची तपासणी सुरू केली जाणार असल्याचे वसई वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सागर इंगोळे यांनी सांगितले आहे.

भाजपवर नाराजी

भाजपने मुंबईत ३०० हून अधिक दहीहंडय़ा बांधण्याची घोषणा केल्यानंतर गोविंदा पथकांमध्ये उत्साह संचारला होता. मात्र या दहीहंडय़ा नेमक्या कुठे बांधणार हे जाहीर करण्यात आले नव्हते. तसेच भाजपने वरळीमधील जांबोरी मैदानात आयोजित केलेल्या दहीहंडीसाठी परितोषिकांची घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे गोविंदा पथकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.

मुंबई-ठाण्यात संभ्रम

गोपाळकाल्याच्या दिवशी रात्री १० वाजेपर्यंत उत्सवाला परवानगी आहे. गोविंदा पथके आपापल्या विभागातून सकाळी ९-१० च्या सुमारास मानाच्या दहीहंडय़ा फोडून मार्गस्थ होतात. मोठय़ा आयोजकांची दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांची गर्दी होते. त्यामुळे दहीहंडी फोडण्यासाठी बराच वेळ वाट पाहावी लागते. परिणामी, वेळ वाया जातो. आता पारितोषिकाची रक्कम कमी असल्यामुळे मुंबईतून ठाण्यापर्यंत जायचे की नाही असा प्रश्न गोविंदांना पडला आहे.

मराठीतील सर्व वसई विरार ( Vasaivirar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Violation of rules by school bus drivers continues in vasai virar city zws

Next Story
१२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार ; तीन मित्रांचे कृत्य, मैत्रिणीला अटक
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी