वसई :  वसई, विरार शहरात विविध ठिकाणच्या भागात आजही शालेय विद्यार्थ्यांच्या बसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी बसवून वाहतूक केली जात आहे. बुधवारी नायगाव पूर्वेच्या भागात शाळकरी मुलांना घेऊन जाणारी बस ही एका बाजूला कलंडली होती. या घडलेल्या प्रकारामुळे पुन्हा शाळकरी मुलांच्या सुरक्षित वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करोना काळात शाळा बंद होत्या आता शाळा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी वाहनेही सुरू झाली आहेत.  आजही शहरात विविध ठिकाणच्या भागात नियमांचा भंग करून क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची ने-आण केली जाते. याशिवाय  अग्निशमन सुरक्षा यंत्रणाबाबतच्या नियमाकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.  नुकताच नायगाव पूर्वेच्या टिवरी फाटा येथे शाळकरी मुलांना घेऊन जाणारी बस कलंडली होती. सुदैवाने ही बस खाली कोसळली नसल्याने मोठी दुर्घटना टळली. स्थानिकांच्या मदतीने आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्याचे दरवाजे उघडून विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आले. या घडलेल्या घटनेमुळे पुन्हा एकदा शहरात शाळकरी मुलांच्या सुरक्षित वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे.  यासाठी शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बसेस व इतर गाडय़ा यांचे वैध विमा प्रमाणपत्र,  वाहन योग्यता प्रमाणपत्र, चालक-मदतनीस, आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्याचे मार्ग इत्यादी बाबींची तपासणी करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Violation of rules by school bus drivers continues in vasai virar city zws
First published on: 19-08-2022 at 01:05 IST