scorecardresearch

बजरंग दलाचा भाईंदरमधील सिनेमागृहाबाहेर राडा ; ‘पठाण’ चित्रपट बंद पाडण्याचा हिंसक प्रयत्न

भाईंदर मध्ये पठाण चित्रपटाचा खेळ रद्द करण्यासाठी बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी सिनेमागृहात तुफान राडा केला असल्याची घटना घडली आहे.

pathan movie
बजरंग दलाचा भाईदर मधील सिनेमागृहाबाहेर राडा

भाईंदर मध्ये पठाण चित्रपटाचा खेळ रद्द करण्यासाठी बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी सिनेमागृहात तुफान राडा केला असल्याची घटना घडली आहे.या प्रकरणात भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हाची नोंद करण्यात आली असून नऊ आरोपींना अटक करण्यात आली आहे.बहुचर्चित ‘पठाण’ सिनेमा गुरुवारी देशभरात प्रसिद्ध झाला आहे. या चित्रपटाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मात्र या चित्रपटाला हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केला आहे.

रविवारी संध्याकाळी ४ च्या सुमारास भाईंदर पश्चिम येथील मॅक्सेस मॉलमध्ये सुरू असलेला चित्रपटाचा खेळ बंद करण्यासाठी बजरंग दलच्या कार्यकर्त्यांकडून मोर्चा काढण्यात आला होता.या प्रसंगी कार्यकर्त्यांनी चित्रपट गृहाबाहेर लावलेले ‘पठाण’ चित्रपटाचे पोस्टर फाडून तिकीट खिडकीची देखील तोडफोड केली.या घटनेची माहिती जवळील पोलीस ठाण्याला मिळताच त्यांनी त्या ठिकाणी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.तर या संदर्भात दंगल करणे, मनाई आदेशाचे उल्लंघन करणे अशा विविध कलमा अंतर्गत भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून नऊ आरोपीना अटक करण्यात आली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुगुटलाल पाटील यांनी दिली.

मराठीतील सर्व वसई विरार ( Vasaivirar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-01-2023 at 20:03 IST
ताज्या बातम्या