पालघरच्या नालासोपारा भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. पाटणकर पार्क येथील वाहतूक पोलीस गोदामामध्ये एका जोडप्याने ड्युटीवर असलेल्या महिला पोलिसाला दुचाकीने चिरडण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, या जोडप्याला तेथून पळ काढल्यात अपयश आले आहे. पोलिसांनी त्यांना अटक केली असून दोघांवरही वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे अटक करण्यात आलेला आरोपी हा पेशाने वकील आहे. या अपघातात महिला पोलिसकर्मीच्या हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी २६ सप्टेंबर रोजी बृजेश कुमार भलौरिया या इसमाने आपली दुचाकी नो-पार्किंग झोनमध्ये लावली होती. यानंतर वाहतूक पोलिसांनी कारवाई करून ही दुचाकी गोदामात जमा केली. दुपारी एकच्या सुमारास बृजेश आणि त्याची पत्नी डॉली गोदामात पोहोचले आणि पोलिसांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी महिला पोलीस प्रज्ञा दळवी ड्युटीवर होत्या.

Video : …अन् पूल तोडणाऱ्या बुलडोझरनेच अवघ्या काही क्षणात घेतली जलसमाधी; धक्कादायक घटना कॅमेऱ्यामध्ये कैद

दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की बृजेश दंड न भरताच आपली दुचाकी घेऊन जात होता. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या महिला पोलिसकर्मीने त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र बृजेश थांबण्यास तयार नव्हता. त्याने महिला पोलिसाला फरपटत नेण्याचाही प्रयत्न केला, मात्र तो यशस्वी झाला नाही. काही वेळातच इतर लोक तेथे पोहोचले. बृजेशची त्यांच्यासह बाचाबाची झाली.

पोलिसांचा आरोप आहे की बृजेशने आपल्या दुचाकीच्या मदतीने महिला पोलीस प्रज्ञा दळवी यांना चिरडण्याचा प्रयत्न केला. यामुळे दळवी यांच्या हाताला आणि पायाला गंभीर दुखापतही झाली आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी यावर संताप व्यक्त केला आहे.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video husband and wife attempt to crush a policeman in nalasopara case filed pvp
First published on: 30-09-2022 at 09:37 IST