scorecardresearch

विरार मध्ये भुरट्या चोरांनी प्रवाशाला मारहाण करून लुटले

रेल्वे परिसरात प्रवाशांना लुटाण्याच्या घटना वाढत चालल्या आहेत.

विरार : रेल्वे परिसरात प्रवाशांना लुटाण्याच्या घटना वाढत चालल्या आहेत. विरार रेल्वे स्थानाकात मध्यरात्री २ च्या सुमारास तीन ते चार भुरट्या चोरांनी एका प्रवाशाला बेदम मारहाण करत लुटल्याची घटना रविवारी घडली आहे. सदराची घटना सिसिटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून रेल्वे पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

विरार फ्लॅटफॉर्म वरील स्वयंचलित जिन्यात ही घटना घडली. चार चोरट्यांनी चक्क प्रवाशाला मारहाण करत लुटले.

रविवारी रात्री अडीच च्या सुमारास एक प्रवासी एसकेलेटर चा वापर करत करत कामावरून घरी जात असणाऱ्या प्रवाशाला चार चोरट्यांच्या टोळीने हेरून त्याचा पाठलग करत एकटा असताना त्यावर हल्ला चढवीला. आणि त्याच्या गळ्यातील सोनसाखळी व मोबाईल फोन घेऊन पसार झाले .
या संदर्भात वसई लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वसई लोहमार्ग पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

मागील महिन्यात याच रेल्वे स्थानाकात अशाच प्रकारे एका प्रवाशाला लुटले होते. त्या अगोदर वसई रेल्वे स्थानाकताही असाच प्रकार समोर आला होता. यामुळे वसईतील रेल्वे स्थानके प्रवाशांसाठी दिवस

मराठीतील सर्व वसई विरार ( Vasaivirar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Virar burglars beat robbed passenger vasai railway police amy