वसई:- पतीची दुसरी पत्नी अचानकपणे घरी आल्याने संतापलेल्या पहिल्या पत्नीने तिच्यावर चाकू व त्रिशूलने प्राणघातक हल्ला केल्याची घटना विरार मध्ये घडली आहे. कोमल सरोज असे या हल्ल्याते जखमी महिलेचे नाव आहे. या प्रकरणी बोळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विरारच्या मे फेअर गार्डन मध्ये लक्ष्मी प्रसाद (३१) ही महिला आपल्या पतीसह राहत होती. मात्र तिच्या पतीने जुलै २०२६ मध्ये कोमल सरोज (२२) या महिलेशी दुसरं लग्न केलं होतं. ही बात त्याने पत्नीशी लपवून ठेवली होती. रविवारी दुसरी पत्नी अचानक घरी आली. त्यातून दोन्ही महिलांचा जोरदार वाद झाला
आरोपी लक्ष्मी ने घर आतून बंद केले आणि कोमल वर चाकू, आणि त्रिशूळ ने हल्ला केला. जीव वाचवायला कोमल आतल्या बेडरूम मध्ये जाऊन लपली. जखमी अवस्थेत तिने पोलिसांच्या ११२ या हेल्पलाइन क्रमांकावर कॉल केला.
पोलिसांनी दार तोडून आत प्रवेश केला आणि जखमी कोमल ची सुटका करून रुग्णालयात दाखल केले. आरोपी लक्ष्मीला बोळींज पोलिसांनी अटक केली. आरोपी लक्ष्मी हिच्या विरोधात हत्येच्या प्रयत्न केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९ तसेच ३५२ अन्वये गुन्हा बोळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. जखमी कोमल ची प्रकृती स्थिर असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
