रविवार पासून एसटीची ‘वसई दर्शन’ बस सेवा सुरू होणार
वसई: निसर्गरम्य आणि ऐतिहासिक स्थळांनी बहरलेल्या वसईचे दर्शन आता अवघ्या १४० रुपयांत घेता येणार आहे. एसटी महामंडळाने ‘वसई दर्शन’ ही बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून रविवारपासून ही सेवा प्रायोगिक तत्त्वावर सुरू होत आहे. सध्या ही बस आठवडय़ातून एकदाच रविवारी सेवा देणार असून प्रवाशांच्या प्रतिसादानंतर फेऱ्यांमध्ये वाढ होणार आहे.

वसई विरार हे ऐतिहासिक वारसा लाभलेलं आणि निसर्गसौंदर्याने बहरलेलं शहर आहे. पुरातन किल्ले, चर्चेस, मंदिरे, अडीच हजार वर्ष जुना बौद्ध स्तूप बघण्यासाठी राज्यातून तसेच देशभरातून पर्यटक आणि अभ्यासक येत असतात. याशिवाय नयनरम्य किनारपट्टीवर फिरण्यासाठी पर्यटक येत असतात. मात्र या पर्यटन स्थळांना जोडण्यासाठी कुठलीही वाहतूक सेवा नव्हती. वाहतूक सेवेअभावी सर्वसामान्य पर्यटकांना या स्थळांना भेटी देता येत नव्हत्या. ती गरज लक्षात घेऊन एसटी महामंडळाने वसई दर्शन ही बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. दर रविवारी सकाळी ७ वाजता वसई स्थानकातून ही पर्यटन बस निघणार आहे.

Municipal Corporation ignoring quakes in navi mumbai delayed in making rule for builders
नवी मुंबई : हादऱ्यांच्या मालिकेकडे महापालिकेचा काणाडोळा, बिल्डरांच्या सोयीसाठी नव्या नियमावलीला मुहूर्त सापडेना
curiosity about indians performance in paris olympic
अन्वयार्थ : असले ‘अव्वल स्थान’ काय कामाचे?
village maps
गाव नकाशे नसल्याने मच्छीमारांचे अस्तित्व धोक्यात, पंचवीस वर्षांपासून प्रतीक्षा
pashmina, Ladakh
लडाखची पश्मिना संकटात का सापडली आहे? सरकार तिला वाचवेल का?

असे होईल वसई दर्शन
सकाळी ७ ते रात्री ८ या कालावधीत ही बससेवा वसईचे दर्शन पर्यटकांना घडविणार आहे. त्याचे शुल्क प्रति व्यक्ती १४० रुपये असणार आहे. पोर्तुगिजांच्या ताब्यातून चिमाजी अप्पांनी जिंकलेला वसईचा किल्ला, गिरीज येथील साडेचारशे वर्षे जुने चर्च, निर्मळ येथील शंकराचार्याचे मंदिर, सोपारा गावातील अडीच हजार वर्षे जुने आंतरराष्ट्रीय दर्जाचे बौध्द स्तूप आणि अर्नाळा समुद्र किल्ल्याची भटकंती या बसमधून घडवली जाणार आहे. सध्या ही बससेवा प्रायोगिक तत्त्वावर केवळ आठवडय़ाला एक दिवस असणार आहे. प्रवाशांचा प्रतिसाद पाहून ही बससेवा वाढवली जाणार असल्याची माहिती पालघर आगाराचे विभागीय नियंत्रक दिलीप जगताप यांनी दिली. ही बस आरामदायी असून नंतर ती वातानुकूलित केली जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. यामुळे वसईच्या पर्यटनाला चालना मिळणार आहे, असा विश्वास राज्य मार्ग परिवहन महामंडाळाने व्यक्त केला आहे.

पालिकेच्या ‘पर्यटन बस’ कागदावरच
वसई-विरार महापालिकेची परिवहन सेवा २०१२ पासून सुरू आहे. वसई विरार शहरात पर्यटन बससेवा सुरू करण्याचा मानस दरवर्षी महापालिकेच्या अर्थसंकल्पात केला जातो. मात्र आजतागायत ही बससेवा सुरू करण्यात आलेली नाही. पालिकेच्या परिवहन विभागाची वसई दर्शन बससेवा कागदावरच राहिली आहे.