रविवार पासून एसटीची ‘वसई दर्शन’ बस सेवा सुरू होणार
वसई: निसर्गरम्य आणि ऐतिहासिक स्थळांनी बहरलेल्या वसईचे दर्शन आता अवघ्या १४० रुपयांत घेता येणार आहे. एसटी महामंडळाने ‘वसई दर्शन’ ही बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून रविवारपासून ही सेवा प्रायोगिक तत्त्वावर सुरू होत आहे. सध्या ही बस आठवडय़ातून एकदाच रविवारी सेवा देणार असून प्रवाशांच्या प्रतिसादानंतर फेऱ्यांमध्ये वाढ होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वसई विरार हे ऐतिहासिक वारसा लाभलेलं आणि निसर्गसौंदर्याने बहरलेलं शहर आहे. पुरातन किल्ले, चर्चेस, मंदिरे, अडीच हजार वर्ष जुना बौद्ध स्तूप बघण्यासाठी राज्यातून तसेच देशभरातून पर्यटक आणि अभ्यासक येत असतात. याशिवाय नयनरम्य किनारपट्टीवर फिरण्यासाठी पर्यटक येत असतात. मात्र या पर्यटन स्थळांना जोडण्यासाठी कुठलीही वाहतूक सेवा नव्हती. वाहतूक सेवेअभावी सर्वसामान्य पर्यटकांना या स्थळांना भेटी देता येत नव्हत्या. ती गरज लक्षात घेऊन एसटी महामंडळाने वसई दर्शन ही बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. दर रविवारी सकाळी ७ वाजता वसई स्थानकातून ही पर्यटन बस निघणार आहे.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Visiting historical and scenic places vasai st vasai darshan bus service will start from sunday amy
First published on: 15-06-2022 at 00:05 IST