वसई: मुंबईत राहणाऱ्या एका लॉटरी विक्रेत्याला अचानक सात लाखाची लॉटरी लागली. त्यामुळे त्याचा आनंद गगणात मावेनासा झाला. मात्र दारात पोलीस आले आणि खरा प्रकार उघडकीस आला. ही रक्कम एका महिलेने चुकून त्याच्या खात्यावर वळती केली होती.

मीरा रोड येथे राहणाऱ्या पूनम खान (३८) या महिलेचे फेडरल बँक ऑफ इंडियामध्ये खाते आहे. त्यांनी २९ जून रोजी आपल्या नातेवाईकाला ७ लाख रुपये  पाठवले होते. मात्र पूनम यांच्याकडून खात्याचा क्रमांक लिहिताना एक आकडा चुकला  आणि हे पैसे चुकून मुंबईत राहणारा हिरालाल पटेल या लॉटरी विक्रेत्याच्या खात्यामध्ये २९ जून रोजी वळते झाले होते. नातेवाईकांना हे पैसे मिळाले नसल्याचे समजतात पूनम यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी बँकेत धाव घेतली. ही रक्कम तुम्ही पाठवली असल्याने या चुकीला तुम्ही जबाबदार आहात. बँक काही मदत करणार नाही असे सांगण्यात आले.  पैसे परत मिळवण्यासाठी पूनम खान यांनी पोलीस ठाणे गाठले. मात्र त्यांनी दाद दिली नाही. शेवटी  मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या सायबर पोलीस ठाण्यात संपर्क केला. सायबर पोलिसांनी ऑनलाइन झालेला व्यवहार तपासला. हे पैसे युनियन बँक ऑफ इंडियाचे खातेदार पटेल यांच्या खात्यात वळते झाले होते. सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजित कुमार गुंजकर यांनी पटेल यांच्याशी संपर्क केला. मात्र मला सात लाखांची लॉटरी लागली असाच दावा त्याने केला.  पोलिसांनी त्याला वस्तुस्थिती सांगून पुरावे दाखवले आणि पैसे परत न केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला. त्यामुळे पाटील याने सात लाख रुपये फिर्यादी महिलेला परत केले.

stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
Sarbajeet singh
सरबजित सिंगच्या मारेकऱ्याची पाकिस्तानात हत्या; मुलगी म्हणते, “हा न्याय…”
arvind kejriwal
तुरुंगात अरविंद केजरीवालांचं ४.५ किलो वजन घटलं, आप नेत्या आतिशी म्हणाल्या, “त्यांना काही झालं तर…”
Byju employees lost their jobs
नोटीस पीरियड नाही, पगारही नाही; फक्त एक फोन कॉल अन् बायजूच्या कर्मचाऱ्यांनी नोकरी गमावली

पोलिसांचे आवाहन

आपण दैनंदिन जीवनामध्ये सतत ऑनलाइन व्यवहार करत असतो. त्यामुळे बँकेमध्ये पैसे भरताना खाते क्रमांक तपासून पाहावा आणि खात्री करावी, असे आवाहन सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुंजकर यांनी केले आहे.