वसई: मुंबईत राहणाऱ्या एका लॉटरी विक्रेत्याला अचानक सात लाखाची लॉटरी लागली. त्यामुळे त्याचा आनंद गगणात मावेनासा झाला. मात्र दारात पोलीस आले आणि खरा प्रकार उघडकीस आला. ही रक्कम एका महिलेने चुकून त्याच्या खात्यावर वळती केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मीरा रोड येथे राहणाऱ्या पूनम खान (३८) या महिलेचे फेडरल बँक ऑफ इंडियामध्ये खाते आहे. त्यांनी २९ जून रोजी आपल्या नातेवाईकाला ७ लाख रुपये  पाठवले होते. मात्र पूनम यांच्याकडून खात्याचा क्रमांक लिहिताना एक आकडा चुकला  आणि हे पैसे चुकून मुंबईत राहणारा हिरालाल पटेल या लॉटरी विक्रेत्याच्या खात्यामध्ये २९ जून रोजी वळते झाले होते. नातेवाईकांना हे पैसे मिळाले नसल्याचे समजतात पूनम यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी बँकेत धाव घेतली. ही रक्कम तुम्ही पाठवली असल्याने या चुकीला तुम्ही जबाबदार आहात. बँक काही मदत करणार नाही असे सांगण्यात आले.  पैसे परत मिळवण्यासाठी पूनम खान यांनी पोलीस ठाणे गाठले. मात्र त्यांनी दाद दिली नाही. शेवटी  मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या सायबर पोलीस ठाण्यात संपर्क केला. सायबर पोलिसांनी ऑनलाइन झालेला व्यवहार तपासला. हे पैसे युनियन बँक ऑफ इंडियाचे खातेदार पटेल यांच्या खात्यात वळते झाले होते. सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजित कुमार गुंजकर यांनी पटेल यांच्याशी संपर्क केला. मात्र मला सात लाखांची लॉटरी लागली असाच दावा त्याने केला.  पोलिसांनी त्याला वस्तुस्थिती सांगून पुरावे दाखवले आणि पैसे परत न केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला. त्यामुळे पाटील याने सात लाख रुपये फिर्यादी महिलेला परत केले.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman mistakenly transfer 7 lakh to lottery seller account zws
First published on: 05-07-2022 at 01:38 IST