scorecardresearch

Video: चालत्या लोकलमध्ये तरुणाची जीवघेणी स्टंटबाजी

विरार ते चर्चगेट चालत्या लोकलमध्ये एका तरुणाने जीवघेणी स्टंटबाजी केल्याचा प्रकार समोर आला आहे.

young man stunt in local train
एका प्रवाशाने धोकादायक स्टंट करीत असलेल्या तरुणाची चित्रफीत आपल्या मोबाईल कमेऱ्यात कैद केली आहे.(फोटो सौजन्य- लोकसत्ता टीम)

लोकसत्ता प्रतिनिधी

वसई: विरार ते चर्चगेट चालत्या लोकल मध्ये एका तरुणाने जीवघेणी स्टंटबाजी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकाराची चित्रफीत समाजमाध्यमावर प्रसारित होऊ लागली आहे.

harideep singh nijjar
पार्किंगजवळ अडवली गाडी, झाडल्या ५० गोळ्या; हरदीपसिंग निज्जरच्या हत्येचा थरारक घटनाक्रम वाचा!
amruta-fadanvis-daughters-day-post
“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट
supriya sule raj thackeray
“राज ठाकरेंचं कौतुक करते, कारण…”, सुप्रिया सुळे यांचं विधान
supriya sule on pankaja munde
पंकजा मुंडेंवरील कारवाईवरून सुप्रिया सुळेंची भाजपावर टीका; म्हणाल्या, “निष्ठावंतांवर किती अन्याय…”

आताच्या काळात इंस्टाग्राम यासह विविध समाज माध्यमावर व्हिडिओ टाकण्यासाठी धोकादायकरित्या स्टंटबाजी करण्याचे प्रकार समोर येऊ लागले आहेत. गुरुवारी रात्रीच्या सुमारास विरार-चर्चगेट या चालत्या लोकलमध्ये एका तरुणाने स्टंटबाजी केली आहे. लोकल डब्याच्या खांबाला पकडून खालील पायरीवर उतरून हा तरुण धोकादायक स्टंट करीत असल्याचे दिसून आले आहे.

एका प्रवाशाने धोकादायक स्टंट करीत असलेल्या तरुणाची चित्रफीत आपल्या मोबाईल कमेऱ्यात कैद केली आहे. सध्या ही चित्रफीत सर्वत्र प्रसारित होऊ लागली आहे. या तरुणाने केलेल्या जीवघेण्या स्टंटबाजीच्या प्रकारामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

आणखी वाचा-भाईंदर: खेळताना हृदयविकाराचा झटका आल्याने खेळाडूचा मृत्यू

आमच्याकडे या घडलेल्या प्रकाराची चित्रफीत आली असून हा तरुण कोणत्या लोकलने प्रवास करीत होता अशी सर्व माहिती घेऊन त्याचा शोध घेऊन कारवाई केली जाईल असे वसई रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन इंगवले यांनी आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-09-2023 at 13:01 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×