विशेषत: घर खरेदी करताना स्त्रिया आपल्या घराच्या कल्पना, अपेक्षा नि स्वप्नं या जाहिरातीवरूनच ठरवत असाव्यात. त्या तश्या ठरवण्यात वावगे काहीच नाही. आणि केवळ स्त्रियाच असे ठरवतात असे नसून, पुरुषही जाहिरातीवरूनच आपल्या घराची कल्पना करत असतात. आपण घर विकत घेताना, जाहिरातीतल्या घरापेक्षा आपल्या कुवतीत बसणाऱ्या घरासाठी आग्रही असलो पाहिजेत.

जाहिरात ही पासष्टावी कला! या कलेचा सर्वाधिक प्रभाव विशेषत: मुले व महिलांवर पडत असावा. बालहट्टातून याचा अनुभव येतो. तशीच स्त्री हट्टातूनही याची जाणीव होते. विशेषत: घर खरेदी करताना स्त्रिया आपल्या घराच्या कल्पना, अपेक्षा नि स्वप्नं या जाहिरातीवरूनच ठरवत असाव्यात. त्या तश्या ठरवण्यात वावगे काहीच नाही. आणि केवळ स्त्रियाच असे ठरवतात असे नसून पुरुषही जाहिरातीवरूनच आपल्या घराची कल्पना करत असतात. नमनाला घडाभर तेल घालण्याचे कारण असे की आपण घर विकत घेताना, जाहिरातीतल्या घरापेक्षा आपल्या कुवतीत बसणाऱ्या घरासाठी आग्रही असलो पाहिजेत.

March 2024 Monthly Horoscope in Marathi
March 2024 Monthly Horoscope : मार्च महिन्यात या तीन राशींचे बदलणार नशीब? वैवाहिक जीवन, करिअर अन् आर्थिक लाभ; ज्योतिषशास्त्र काय सांगते…
personality of jacob rothschild
व्यक्तिवेध : जेकब रोथशील्ड
Women Health
स्त्री आरोग्य : लग्नानंतर लगेच मूल होत नाहीए?
in china son in law service provide by agency
चिनी पुरुष श्रीमंत पत्नीच्या शोधात, घरजावई होण्यास इच्छुक; नेमके कारण काय?

स्पष्टपणे सांगायचं म्हटलं तर मध्यमवर्गीयांची काही स्वप्न असतात, त्यातील एक म्हणजे स्वत:चं, हक्काचं घर. आयुष्यभर काबाडकष्ट, काटकसर करून, मुलाबाळांचा सांभाळ करून साठवलेल्या पुंजीच्या आधारावर घर घेण्याचे स्वप्न पाहिले जाते. कर्ता पुरुष आपले ‘कर्तृत्व’ वा ‘कर्तबगारी’ या ध्येयाने घराचा शोध घ्यायला निघतो. अर्थात सोबत अर्धागिणी असते. सुरुवातीला स्टेशनच्या जवळच्या घरांचा शोध घ्यायला सुरुवात होते. तिथला घराचा दर पाहून स्टेशनपासून दूर दूर जात शहराच्या एका कोपऱ्यातील गृहसंकुलापर्यंत पोहचतात. इथला घराचा दर, कर्जाचे स्रोत, कागदपत्रांची जुळवाजुळव जमते असं वाटते नि उभयतांच्या चेहऱ्यावर हसू उमलतं. इथपर्यंत पोहचण्यासाठी दीड-दोन महिन्यांचा कालावधी नि चार-दोन हजारांचा खर्च झालेला असतो. बिल्डरला तीस-पन्नास हजार रुपये देऊन बुकिंग करण्याअगोदरच घर बुक केल्याची   वार्ता सर्वत्र पसरते (अर्थात आपोआप नाही..) नि इथे खरी ठिणगी पडते. शेजारच्या स्त्रिया विशेषत: नव्या घराच्या मूळ रचनेत बदल करून, स्वयंपाक घर आधुनिक बनवण्याचे विचार बोलून दाखवतात. ग्रिल, संरक्षक दरवाजा, फर्निचर, पाण्याची      (पान २ वर)

(पान १ वरून) टाकी.. एक ना अनेक (या सगळ्या मध्यमवर्गीयांना गृहीत धरूनच गरजा मांडल्या आहेत. वरच्या श्रेणीच्या गरजा मलाच ठाऊक नाहीत.)

संध्याकाळी कर्ता पुरुष घरात आला की बायकोची नव्या घराबद्दलचा कल्पनाविलास सुरू होतो. खरं तर कर्त्यां पुरुषाने आपल्या अर्धागिणीच्या प्रेरणेमुळे, महत्त्वकांक्षेपोटी, तिच्याच काटकसरी संसारामुळे नव्या घराची स्वप्ने पाहिलेली असतात. बुकिंग केल्यापासून आकडय़ांची जुळवाजुळव करण्यात त्याचा मेंदू शिणलेला असतो. घडाळ्यातले आकडेसुद्धा त्याला लाखात दिसतात. प्रत्यक्ष किमतीपेक्षा अन्य खर्च म्हणजे प्रोसेसिंग शुल्क, कर आदींची भरपाई करण्यात त्याचा जीव मेटाकुटीला आलेला असतो. तो तसं सांगण्याचा प्रयत्न करतो. पण अर्धागिणीला वाटतं, ती बोलते, ‘तुम्हाला कसली हौसच नाही. मला मात्र किचन माझ्या मनासारखच पाहिजे हं, आत्ताच सांगून ठेवते.’

कर्त्यां पुरुषाला अर्धागिणींचा हा हट्ट पुरवण्यात फार आनंद वाटणार आहे, पण त्याची अडचण पैशांची आहे. अशा वेळी मदतीला येणारे शोधून सापडत नाहीत. पण खरं तर ही इष्टापत्तीच मानायला हवी.

कर्ता पुरुष समजावण्याच्या सुरात म्हणतो, ‘अगं, आधी आपण घर ताब्यात घेऊ, राहायला जाऊ, तिथं राहताना येणाऱ्या अडचणीवर मात करू. गरज असेल तर बदल करू. एवढेच काय माझ्या फंडाची मोठी रक्कम हातात पडली ना की तुला हवा तसं बदल करू. बस्स. प्रॉमिस.’ इतक्या संवादाने फारच थोडय़ा घरात शांतता नांदत असावी. अशा गृहिणीचे अभिनंदन करायला हवे.

पण बऱ्याचशा मध्यमवर्गीय घरात वादळ उठते. मालिका, चित्रपट यात पाहिलेल्या, मैत्रिणीच्या, नातेवाईकांच्या घरांची चित्रे डोक्यात ठेवणाऱ्या महिला कर्त्यां पुरुषाला कर्जाच्या खाईत लोटतात. त्यांचे तत्त्वज्ञान पुढीलप्रमाणे असते. ‘वीस लाखांचं कर्ज झालंच आहे ना, आणखी एक लाखाचं झाल्यावर काय आभाळ कोसळेल? इथल्या पथपेढीतून उचलू या का आपण एक लाखाचं कर्ज?’ या कर्जाची माहितीसुद्धा आधीच काढून ठेवलेली.

अशा वेळी कर्त्यां पुरुषाने कर्तव्यापेक्षा भावनेला महत्त्व दिले तर तो कर्जाच्या खाईत जातो. या साऱ्याचा परिणाम कुटुंबांच्या भविष्यातील आर्थिक परिस्थितीवर होतो. तेव्हा घर खरेदी करताना, ‘नवऱ्यांनो, बायकोला सांभाळा’ अशीच म्हणायची वेळ येते. कारण कोणत्याही विकासकाच्या कार्यालयात घराची चौकशी करताना अर्धागिणीसोबत गेल्यास आपल्याला साडीच्या खरेदीला गेलेल्या अनुभवाची प्रचीती येते. तिथला कार्यकर्ता कर्त्यां पुरुषाकडे शंभर टक्के दुर्लक्ष करून अर्धागिणीला आख्खा प्रोजेक्ट सादर करतो! आहे की नाही जाहिरातीची कला! त्याला माहीत असतं कर्त्यां पुरुषाला आपण तासभरात जे समजावून सांगू ते पटेलच याची खात्री देता येणार नाही. पण अर्धागिणी मात्र हे काम चट्दिशी करू शकेल. ‘डबलसीट’सारख्या चित्रपटातील घराची कहाणी चित्रपटातच शोभून दिसते. मध्यमवर्गीयांना यापेक्षा खूप संघर्ष करावा लागतो.

जर्मनसारख्या देशात कार्पोरेट क्षेत्रात काम करणारे लोक घरापासून कार्यालयात जाताना शेअरिंगने प्रवास करतात. प्रत्येक गोष्ट आपल्या मालकीची असलीच पाहिजे, असा दुराग्रह त्यांनी सोडण्याचा नवा पायंडा सुरू केलाय. तसाच इथल्या मध्यमवर्गीयाने मालकीच्या घराचा विचार करून आयुष्य कर्ज फेडण्यात, झिजवण्यात अर्थ नाही. तसं पाहिलं तर भाडय़ाच्या घरात राहाणेही तितकेच आनंदी, आरामदायी आहे असते. इथे फक्त अकरा महिन्यांचे करारपत्र आडवे येतेय. दर अकरा महिन्यांनी घर बदलण्याच्या प्रक्रियेमुळे ‘स्वत:चे घर’ ही कल्पना अधिक ठसठशीतपणे हृदयात जपली जाते. स्वत:चे घर घेतले तर आयुष्यभराची पुंजी, कर्ज, बँकेचे हप्ते, सोसायटीचा मेंटनन्स, रिक्षाभाडे याचा वाढता खर्च पाहिल्यास भाडय़ाच्या घरात राहणे किफायतशीरच आहे. बरं इथे दुरुस्ती, सांभाळ याचा खर्चही नाही. फक्त कायदेशीर बाब म्हणून १५-२० वर्ष एकाच घरात, ठरावीक पटीने भाडेवाढ करून रहाण्याची खात्रीशीर सोय झाली तर ‘स्वत:चे घर’ ही संकल्पनाच ठिसूळ होईल. फक्त या ‘गोष्टीची’ थोडी जाहिरात करायला हवी.