News Flash

देवी मंदिरांचे वास्तुवैभव

सप्तशृंगी परिसर कातळांनी वेढलेला आहे. तरी प्रसन्न हवामानामुळे वातावरण रूक्ष वाटत नाही.

डोंगरमाथ्यावरील मंदिरांना भूपृष्ठावरील मंदिरांप्रमाणे अलौकिक शिल्पकलेचा नजराणा लाभला नसला तरी डोंगरदऱ्यांच्या वातावरणाशी सुसंगत अशी तेथील मंदिररचना म्हणजे पुरातन मानवी शिल्पकलेची ती जणू प्राथमिक अवस्था आहे. डोंगरदऱ्यांचे सान्निध्य लाभलेले गडकोट हा जसा आमचा ठेवा आहे, तसेच तेथील मंदिर वास्तू आमच्या श्रद्धास्थानाबरोबर वारसा वास्तूही आहेत.

महाराष्ट्राला आभाळाला स्पर्श करणारे जे उंच पहाड लाभले आहेत ते जसे पर्यटक, गिर्यारोहकांना आकर्षित करताहेत, तसे त्यांच्या सान्निध्यातील श्रद्धास्थानांमुळे त्याला प्राचीन काळापासून पावित्र्य, मांगल्यामुळे महत्त्व लाभले आहे. भूपृष्ठावरील अनेक मंदिर वास्तूंना जे स्थान आहे तसेच या डोंगरमाथ्यावरील मंदिरांना आहे. भूपृष्ठावरील मंदिरांप्रमाणे अलौकिक शिल्पकलेचा नजराणा त्यांना जरी लाभला नसला तरी डोंगरदऱ्यांच्या वातावरणाशी सुसंगत अशी तेथील मंदिररचना म्हणजे पुरातन मानवी शिल्पकलेची ती प्राथमिक अवस्था आहे. अजोड कलाकृतीपेक्षाही श्रद्धावान भाविकांना नतमस्तक व्हायला डोंगरदऱ्यातील मंदिरांचा निश्चितच आधार वाटतोय. आजही या भावनेपोटी असंख्य भक्तांना तेथे शेकडो पायऱ्या चढून जाताना श्रम जाणवत नाहीत. नाशिकनजीकच्या सप्तशृंगी गडावर याचा निश्चितच अनुभव घेण्यासारखा आहे.

सह्य़ाद्रीच्या पूर्व-पश्चिम रांगेत समुद्रसपाटीपासून सुमारे ६००० फूट उंचावर हे स्थान धनुष्यासारख्या डोंगरावर वसले आहे. येथील अठरा हातांच्या महिषासुरमर्दिनीच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येत असतात, तर अनेक कुटुंबांची ही देवता कुलदैवत आहे. हा प्रचंड गड तसा दंडकारण्याचा एक भाग होता. ज्ञानेश्वरीच्या अध्यायात सप्तशृंगी कुलस्वामिनीचा उल्लेख आढळतो.

नाशिक शहरापासून ४५ कि.मी. उत्तरेकडे मौजे वणी येथील कळवण तालुक्यात चांदवड डोंगररांगेत सप्तशृंग हा अजस्र पहाड आहे. यातील सप्तशृंगी देवीचे मंदिर हे महाराष्ट्राला लाभलेल्या साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धे पीठ गणले जाते. देशात एकूण जी ५१ शक्तिपीठे आहेत त्यातील कोल्हापूरची करवासिनी महालक्ष्मी, मराठवाडय़ातील उस्मानाबाद जिल्ह्य़ातील तुळजाभवानी, नांदेड जिल्ह्य़ातील माहूरगडावरची रेणुका माता ही तीन शक्तिपीठे म्हणून सर्वश्रुत आहेतच. विराट, अजस्र हे शब्दच ज्याच्यासाठी आहेत अशा डोंगररांगेत सातशृंगे अथवा शिखरांनी वेढलेल्या वातावरणात माता सप्तशृंगीचे स्थान आहे; परंतु प्रत्यक्षात चारच डोंगरशिखरे दृश्यस्वरूपात असल्याने या देवीमातेला चतुशृंगी नावानेही संबोधले जातेय. सप्तशृंगीमातेला महाकाली, महालक्ष्मी तसेच महासरस्वतीचे ओम स्वरूपही मानले जाते.

पर्वतशिखराच्या मध्यभागी सुमारे १८-२० फूट उंच अशी कपार आहे. त्या कपारीलाच महिरपीच कोंदण असून त्यातच सप्तशृंगी देवीची सुमारे आठ फूट उंचीची मूर्ती आहे. मूर्तीच्या भव्यतेसह उंचीमुळे तिची पूजाअर्चा शिडीवर चढून करावी लागते. ही पूर्वाभिमुख देवीची मूर्ती एका प्रचंड खडकात कोरलेली आहे. सप्तशंृंगी मातेचे रूप विलोभनीय आहे.

रेणुकादेवी श्रद्धास्थान तीन पहाडांनी वेढलेले आहे. हे तीन पहाड दत्तशिखर, अत्री अनुसया आणि खुद्द रेणुकेच्या नावे ओळखले जातात. या रेणुकामातेला एकवीरा असेही मानले जाते. या मंदिरावर चौरस आकाराचे शिखर असून त्यावर ध्वज आहे. ५ फूट उंच आणि ४ फूट रुंद असे मंदिर गाभाऱ्याचे प्रवेशद्वार चांदीच्या पत्र्यांनी मढवलेले आहे, तर देवीच्या बैठकीवर सिंहाची मूर्ती कोरलेली आहे.

देवीदर्शनासाठी मार्गस्थ होण्यासाठी वपर्यंत जाण्यासाठी सुमारे ४७५ दगडी पायऱ्या आहेत. या पायऱ्यांचे बांधकाम रुद्राजी आणि कोंडाजी या कान्हेरी बंधूंनी आणि पेशव्यांचे सरदार दाभाडे यांची पत्नी उमाबाईंनी केले आहे. आपण जेव्हा मंदिरानजीक पोहोचतो तेव्हा परिसराच्या दर्शनाने श्रम विसरायला होतात. या डोंगरपायथ्याशीही वाणी गावी देवीचे एक मंदिर स्थान असून त्यालाही सप्तशृंगी नावे संबोधतात. या गडावर जाण्यासाठी जे तीन मार्ग आहेत, त्यातील नांदुरी गावामार्गे जाणे सोयीचे आणि कमी श्रमाचे आहे. यामार्गे गेल्यास मंदिराच्या प्रवेशद्वारीच परस्पर जाता येते. घाट, पाऊलवाटा, पठारी रस्ता अशा मार्गे जाताना वाटेत पाण्याची कुंडेही आढळतात.

सप्तशृंगी परिसर कातळांनी वेढलेला आहे. तरी प्रसन्न हवामानामुळे वातावरण रूक्ष वाटत नाही. इतर गडकोटांप्रमाणे या गडावर पाण्याची आठ कुंडे आढळतात. त्यांना देवदेवतांची नावे देऊन औचित्य साधले आहे. यापैकी सरस्वती, लक्ष्मी, तांबूल, अंबालय, शितला ही पाच कुंडे लहान आकाराची असून काली कुंड, सूर्य कुंड, दत्तात्रय कुंड ही आकारमानाने मोठी आहेत. या कुंडांच्या बांधकामातून प्राचीन काळातील जल व्यवस्थापन दाखवते.

पर्वतशिखराच्या मध्यभागी सुमारे १८-२० फूट उंच अशी कपार आहे. त्या कपारीलाच महिरपीच कोंदण असून त्यातच सप्तशृंगी देवीची सुमारे आठ फूट उंचीची मूर्ती आहे. मूर्तीच्या भव्यतेसह उंचीमुळे तिची पूजाअर्चा शिडीवर चढून करावी लागते. ही पूर्वाभिमुख देवीची मूर्ती एका प्रचंड खडकात कोरलेली आहे. सप्तशंृंगी मातेचे रूप विलोभनीय आहे. देवीच्या प्रत्येक हाती एकूण १८ वस्तू वा शस्त्रे आहेत. मणिमाळा, कमळ, बाण, तलवार, वज्र, गदा, चक्र, त्रिशूळ, कुऱ्हाड, शंख, घंटा, पाश, शक्ती, दंड, ढाल, धनुष्य, पानपत्र आणि कमंडलू यांचा त्यात समावेश आहे. दिवसाच्या प्रत्येक प्रहरी देवीचे स्वरूप वेगवेगळे जाणवते. प्रात:काळच्या समयी ती बाळास्वरूप भासते. मध्यान्ह समयी ती तरुणी, तर सूर्यास्ताच्या वेळी तिला वार्धक्य स्वरूप प्राप्त होते. जणू काही मानवी जीवनाच्या तीन अवस्थाच तिच्या बदलत्या दर्शनातून प्रतिबिंबित होताहेत.

एक विशेष म्हणजे देवीसभोवताली प्रचलित मंदिर बांधकाम नाही. एका १०x२० फूट आकारमानाच्या गुहेतच ही देवी उभी आहे. आता लाकडी बांधकाम वापरलेले हे देवी मंदिर खरे तर आठव्या शतकातले. माणसाच्या प्राथमिक अवस्थेत मंदिर वास्तूचा

उगमही कडेकपारीतील गुहेतच झाला त्याची

यावरून कल्पना येते. हे मंदिर पाहताना आपण नकळत अगदी प्राचीन काळात जातो. दरवर्षी या मंदिर परिसरात चैत्री नवरात्र आणि आश्विन नवरात्रप्रसंगी जी यात्रा भरते तो एक उत्साही जल्लोश असतो. या यात्रेप्रसंगी गुहेच्या माथ्यावर जो दुर्गम सुळका आहे त्याच्यावर निशाण फडकवण्याचा धाडसी, चित्तथरारक कार्यक्रम असतो, त्याचा मान परंपरेनुसार एका कुटुंबाकडे आहे. हा सोहळा रात्रीच्या समयी वाजतगाजत मिरवणुकीनी पार पडतो तो प्रत्यक्ष अनुभवण्यासारखा आहे.

माहूरची रेणुकामाता :

महाराष्ट्राला दुर्मीळ असे डोंगरदऱ्यांचे सान्निध्य लाभलेय. त्यावरील गडकोट हा जसा ठेवा आहे तसेच काही डोंगरमाथ्यांवरील मंदिर वास्तू आमची श्रद्धास्थाने असून त्यांना पुरातन वारसा वास्तूचे वैभव लाभले आहे. मराठवाडय़ातील शिल्पवैभवाला तर विश्वमान्यता लाभली आहे. त्यातील प्राचीन मंदिर शिल्प सौंदर्य वाखाणण्यासारखे आहे. त्यात डोंगरमाथ्यावरील रेणुकामाता मंदिरातून प्राचीन मंदिर बांधकामाची कल्पना येते.

हे रेणुकामाता मंदिर साडेतीन शक्तिपीठांपैकी एक परिपूर्ण असे तीर्थस्थान आहे. मराठवाडा-विदर्भ सीमेवरील नांदेड जिल्ह्य़ातील किनवट तालुक्यात हे पवित्र स्थान आहे. हे स्थान डोंगर भागी उंचावर (२५०० फूट उंच) असून तेथील पर्वतकडय़ावर रेणुका देवीचे मंदिर आहे. मंदिराकडे जाण्यासाठी सुमारे २००० पायऱ्या चढून जावे लागते. या स्थानाला भेट दिल्यावर प्राचीन इतिहास, धार्मिकता आणि संस्कृती याचा उत्कृष्ट मिलाफ येथे अनुभवायला येतो.

कन्नड भाषेत ‘मा’ म्हणजे आई आणि ‘हूर’ म्हणजे गाव. या दोन शब्दांतून माहूर म्हणजेच आईचे गाव हे प्रचलित झाले. हा सारा परिसर डोंगरदऱ्या आणि वनराईनी वेढलेला आहे. गडाच्या पूर्वेस सह्याद्री पर्वतांची रांग आहे. मंदिराकडे मार्गस्थ होताना लहानमोठय़ा आकारांच्या पायऱ्या चढून जावे लागते. मंदिर प्रांगणात आल्यावर प्रथम दृष्टीस पडते ते होमकुंड. मंदिर प्रवेशद्वारातून आत गेल्यावर सभामंडप लागतो, तर मंदिराच्या गाभाऱ्यात पूर्वाभिमुख रेणुकामातेचे तांदळास्वरूप मूर्तीचे दर्शन घडते. मंदिरात सतत नंदादीप तेवत असतो.

मंदिरउभारणीचा काळ सांगणे कठीण आहे, मात्र शालिवाहन काळात त्याचा विस्तार केला गेला. माहूरगडाला १२ व्या शतकापासूनचा इतिहास आहे. बहामनी सत्ताधीशांच्या काळी हा मुलूख एक स्वतंत्र परगणा अस्तित्वात होता.

रेणुकादेवी श्रद्धास्थान तीन पहाडांनी वेढलेले आहे. हे तीन पहाड दत्तशिखर, अत्री अनुसया आणि खुद्द रेणुकेच्या नावे ओळखले जातात. या रेणुकामातेला एकवीरा असेही मानले जाते. या मंदिरावर चौरस आकाराचे शिखर असून त्यावर ध्वज आहे. ५ फूट उंच आणि ४ फूट रुंद असे मंदिर गाभाऱ्याचे प्रवेशद्वार चांदीच्या पत्र्यांनी मढवलेले आहे, तर देवीच्या बैठकीवर सिंहाची मूर्ती कोरलेली आहे. माता मंदिरशेजारीच महालक्ष्मी आणि तुळजाभवानी मातेची मंदिरे आहेत.. आणखीन एक माहूर हे महानुभाव संप्रदायाचे प्रमुख क्षेत्र आहे. महाराष्ट्रातील बऱ्याच कुटुंबांच्या कुलदैवताप्रमाणे कर्नाटक- आंध्र प्रदेशांतही रेणुकामातेची उपासना केली जाते.

सप्तशृंगी आणि रेणुकामाता मंदिर स्थळदर्शनातून प्राचीन पद्धतीच्या मंदिर बांधकामदर्शनाबरोबर तीर्थाटन आणि पर्यटनही साधले जाते.

अरुण मळेकर – vasturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 1, 2016 6:04 am

Web Title: architectural glory of devi temple
Next Stories
1 वास्तू बदलताना!
2 बाल्कनीतल्या रानभाज्या
3 क्षितीज : मार्बलायन!
Just Now!
X