मान्सूनचा चार महिन्यांचा हंगाम संपला आहे आणि नोव्हेंबर महिना जवळ येत असताना, आद्र्रता व तापमानाची पातळी घटण्याची अपेक्षा आहे.

डेंग्यू या डासांशी संबंधित असलेल्या आजाराचे प्रमाण  झपाटय़ाने वाढत असून, या महिन्यामध्ये डेंग्यूची प्रकरणे कमी नोंदवली जातील, असा अंदाज आहे. आजूबाजूच्या परिसराची काळजी घेऊन आणि घर वर्षांतील सर्व दिवस पूर्णत: स्वच्छ ठेवून या आजारांना प्रतिबंध करता येऊ  शकतो.

घरातील स्वच्छतेचे सर्व मुद्दे योग्य प्रकारे विचारात घेतले तरच घर पूर्णपणे स्वच्छ होऊ शकते, हे लक्षात घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. तसेच घरात कुठेही दुरुस्तीची गरज असल्याचे लक्षात आल्यास तातडीने कृती करणे गरजेचे आहे.

साधारणत: समोर येणारे काही प्रश्न पुढे दिले आहेत. तसेच वर्षभर तुमचे घर कोरडे, स्वच्छ आणि शुद्ध राहावे यासाठी काही उपायही दिले आहेत.

कीटक आणि उंदीर यांच्या प्रजननासाठी सुविधा

कीटक आणि डास मान्सूनच्या काळात मोठय़ा प्रमाणात प्रजनन करत असले तरी वर्षभर त्यांना थंडी, उष्णता आणि कोरडेपणा यापासून जेथे संरक्षण मिळते तेथे वर्षभर ते अंडी घालत असतात. उन्हाळ्याच्या अखेरच्या काळात व मान्सूनच्या दरम्यान योग्य तापमान आणि दमटपणाची अनुकूल स्थिती निर्माण झाली की कीटक व डास यांचे प्रजनन होते. त्यांच्या अळ्या आपल्याभोवती असलेल्या ताज्या पाण्याच्या टाक्या, चर, भांडी व झाडांची लागवड येथे जिवंत राहतात. संसर्ग झालेल्या मादी डासाने घातलेल्या अंडय़ांमुळे संसर्ग पसरला जातो.

प्रामुख्याने स्वयंपाकघर व बाथरूम परिसरातील, भिंतींमधील तडे आणि फटी यांच्यावर वेळेवर उपाय केला नाही तर त्यांच्यामध्ये व आजूबाजूला दमटपणा निर्माण होतो आणि त्यामुळे कीटक व उंदीर यांच्या प्रजननासाठी अनुकूल जागा तयार होते. कीटक आणि उंदीर यांची प्रजननक्षमता प्रचंड आहे आणि त्यांची संख्या झपाटय़ाने वाढू शकते. याला प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक काळजी घेणे आणि भिंतींचे गळतीपासून किंवा तडे जाण्यापासून संरक्षण करणे योग्य ठरते.

पाण्याची गळती – पाण्याची गळती थेंबथेंब असू शकते किंवा सगळीकडे पसरेल अशी मोठी असू शकते. घरातील बहुतांश भागात पाण्याचा वापर केला जातो. लहानशी गळतीही दीर्घकाळात मोठय़ा प्रमाणात पाणी वाया जाण्यासाठी कारणीभूत ठरते. तसेच पाण्याच्या गळतीमुळे अनेकदा घरात पाणी साचणे, भिंतींचे डिफॉर्मेशन असे परिणाम होतात, तसेच लाद्याही खराब होऊ लगतात. पाण्याची गळती रोखण्यासाठी महत्त्वाच्या उपायांपैकी एक उपाय म्हणजे, गळती कोठून होते आहे ते ओळखणे. पाइप, पाण्याची टाकी, वॉटर कूलर, वॉश बेसिन आदी ठिकाणी गळती होण्याची शक्यता अधिक असते.

भिंतींतील फटी, तडे बुजवण्यासाठी एम-सील गॅप फिलचा उपयोग करावा. एम-सील गॅप फिल हे सिंगल कम्पोनंट पाणी-आधारित व्हाइट अ‍ॅक्रिलिक कम्पाउंड असून, ते पेस्ट स्वरूपात असते आणि त्यात आणखी काहीही मिसळावे लागत नाही. त्याचा उपयोग टय़ूबच्या साहाय्याने फटी भरण्यासाठी करता येऊ  शकतो आणि चार तास ते योग्य बसल्यानंतर त्यावर रंगही काढता येऊ  शकतो.

पाइप आणि जोडणी यातून पाण्याची गळती रोखण्यासाठी एम-सील इपॉक्सी कम्पाउंडचा वापर करणे सोयीचे ठरते. एम-सील इपॉक्सीमध्ये रेसिन बेस आणि हार्डनर यांचा समावेश असतो. त्याचे मिश्रण योग्य प्रकारे करावे लागते आणि मिश्रणानंतर तातडीने वापरावे लागते. एम-सील फटाफट केवळ ३० मिनिटांमध्ये सील करते.

तुटक्या लाद्या स्लॅब  –  वर्षांनुवर्षे वापराने व खराब झाल्याने फरशा आणि स्लॅब यांच्या कडांना तडे जातात, त्या तुटतात. तुटक्या फरशांवरून चालणे असुरक्षित ठरते. वॉश बेसिनचा ड्रेन पाइप सिंक संरक्षक जाळीच्या इथे जिथे रिकामा होतो ती जागाही उंदीर किंवा कीटक यांना घरात प्रवेश मिळवून देणारी असते.

एअर लिकेज एअर लिकेज सहसा शोधणे कठीण असते. याचा आरोग्यावर घातक परिणाम होऊ  शकतो. गॅल्व्हनाइज्ड आयर्न पाइप, खिडक्या व खिडक्यांच्या चौकटी आणि गॅस सिलिंडर यामध्ये एअर लिकेज सर्रास आढळतात. एअर लिकेजचे आरोग्यावर घातक परिणाम होतातच, शिवाय घराचे सौंदर्यही बिघडते. लोखंडाच्या पाइपना गंज येऊ  शकतो आणि खिडक्यांतील एअर लिकेजमुळे एअर कंडिशनरच्या गारव्यावर परिणाम होऊ  शकतो. सिलिंडरमधील वायुगळती प्रचंड घातक असते आणि त्यांचा पत्ता लागताच त्यावर तातडीने उपाय करायला हवेत.

कोणत्याही फटी, तडे यांच्यामध्ये आणखी वाढ होऊ नये म्हणून त्यावर तातडीने उपाय करायला विसरू नये. घरातील कोणताही भाग खराब झाल्याचे आढळल्यास, त्यावर लवकर उपाय न केल्यास त्याचे विपरित परिणाम दिसून येतात.

तुमच्या घराचे कुठेही नुकसान झालेले असेल तर ते कसे भरून काढायचे, याविषयीच्या मार्गदर्शक टीप्स– 

  • नुकसान शोधून काढणे- झालेले नुकसान शक्य तितक्या लवकर शोधून काढावे.
  • त्या भागात तपास करावा- विविध पृष्ठभाग विशिष्ट असतात आणि त्यामुळे त्यांना विविध प्रकारच्या सीलंट्सची आवश्यकता असते. सीलंट खरेदी करण्यापूर्वी, नुकसान झालेल्या भागाचा पृष्ठभाग जाणून घ्या. एम-सील गॅप फिलचा उपयोग भिंतींतील फट, तडे बुजवण्यासाठी केला जाऊ  शकतो, तर एम-सील इपॉक्सीचा उपयोग पाण्याची गळती, एअर लिकेज व तुटलेल्या टाइल्स, स्लॅब यांच्या सीलिंगसाठी केला जाऊ शकतो.
  • मिश्रण तयार करणे- रेसिन आणि हार्डनर एकत्र केल्यानंतर, तातडीने रासायनिक प्रक्रिया सुरू होते आणि मिश्रण झाल्यानंतर लगेचच त्याचा वापर स्वच्छ भागावर करण्यास सुरुवात करावी.
  • एम-सील गॅप फिल सीलंटचा उपयोग नुकसान झालेल्या भागावर कमी-अधिक प्रमाणात करावा – पहिल्या ५-१० मिनिटांत सीलंट पसरवणे सोपे असते, तर वापर केल्यापासून ३० मिनिटांपर्यंत ओल्या बोटाने सीलंटचा पृष्ठभाग मऊसर करणे शक्य असते. ते सुकू द्यावे आणि सीलंट योग्य प्रकारे बसण्यासाठी चार तासांचा वेळ द्यावा.
  • इपॉक्सी कम्पाउंड १-२ तासांत कठीण होते- इतके की ड्रिलिंग, टॅपिंग, फिलिंग, पेंटिंग आदी कामे सुरू करता येऊ शकतात.

(लेखक पिडिलाइट इंडस्ट्रीज लि.चे सीपी एमएनटी विभागाचे अध्यक्ष आहेत.)