डॉ. अभय खानदेशे

 

readers reaction on loksatta editorial
लोकमानस: बाबा शक्तिशाली झाले त्यात आश्चर्य ते काय?
crime
मंदिरात जिवंत नागपूजा, पुजाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
kolhapur ambabai temple marathi news, ambabai temple devotees kolhapur marathi news,
कोल्हापूर : अंबाबाई मंदिरासमोर खरमाती, मलब्याचे ढीग; भाविकांची कसरत
shri krushna dwarka
श्रीकृष्णाची द्वारका खरंच पाण्याखाली आहे का? दंतकथा आणि पुरावे काय सांगतात? वाचा सविस्तर…

जगातल्या नव्याने उदयास आलेल्या धर्मापकी एक महत्त्वाचा धर्म म्हणजे शीख. पंधराव्या शतकात गुरुनानक यांनी तत्कालीन पंजाब (पंजाबचा शब्दश: अर्थ पाच- पाणी-झेलम, रावी, बिआस, चिनाब आणि सतलज या नद्या) मध्ये स्थापन केला.

पाटना येथील सुप्रसिद्ध पटनासाहिब तख्तापासून साधारण चार किलोमीटर अंतरावर असलेला गुरुद्वारा गायघाट हा शिखांचा पहिला गुरुद्वारा सन १५०९ मधला. गुरुनानक यांनी उद्घाटन केलेला आणि नववे गुरू तेगबहाद्दूर यांनी भेट दिलेला.

शिखांचं सर्वात पवित्र धर्मस्थळ, अमृतसर येथील हरमंदिरसाहिब याचं निर्माण १५८१ ते १५८९ पर्यंत चाललं. स्वत: आर्किटेक्ट असलेल्या पाचवे गुरू अर्जनदेव यांनी शहरातील सर्वात खोलगट जागा मुद्दाम या गुरुद्वारासाठी निवडली. उद्देश सच्चा आणि प्रामाणिक होता. भक्तांनीही नम्रतेने आणि अहंकाराचा त्याग करून आत यावं. (काहीतरी चुकतंय ना. जितका मोठा आणि भव्य पुतळा आपण उभारू तितकं आपलं नाव होणारं हो ना?) . शीख, हिंदू आणि मुघल, बांधकाम शैली असलेल्या हरमंदिरसाहिबची मध्यवर्ती पवित्र जागा (सँक्टम किंवा गाभारा) १२ मी. लांब व १२ मी. रुंद असून दोन मजली उंच आहे. दररोज जवळपास लाखभर भक्त भेट देऊन लंगरचा प्रसाद घेत असलेल्या या मंदिराला, सन १८३० मध्ये महाराजा रणजीतसिंग याने सोन्याचा पत्रा लावला. सुवर्णमंदिर म्हणून आपण ओळखत असलेल्या या गुरुद्वाराच्या चारही बाजूंनी पाणी आहे. हिंदू गंगेचं पाणी बाटलीत भरून आणतात आणि देवघरात ठेवतात, तसे शीख या अमृत सरोवरातील पाणी पवित्र म्हणून घेऊन जातात. सरोवराला ताजे पाणी कायम मिळत राहावे म्हणून अठराव्या शतकात, रावी नदीपासून थेट सुवर्णमंदिरापर्यंत कालवा काढलेला आहे.

तरणतरण येथील गुरुद्वारा हापण सोळाव्या शतकातला. गुरू अर्जनदेव यांनीच बांधलेला. जगभरातल्या गुरुद्वारात, सर्वात मोठे पाण्याचे तळे सभोवती असणारा. शिखांचे दहावे गुरू गोविंदसिंग यांनी सतराव्या शतकाच्या अखेरीस, खालसा पंथ स्थापन केला तो आनंदपूरसाहिब गुरुद्वारा येथे. आज आपण पाहतो ते, संगमरवरातलं भव्य बांधकाम अगदी नवीन. पण जागा मात्र जुनीच. थेट गुरू तेगबहाद्दूर यांनी मूळ गुरुद्वारा बांधलेली.

शिखांचे दहावे गुरू गोविंदसिंग यांचं निर्वाण झालं त्या ठिकाणी, गोदावरीच्या काठावर नांदेड येथे सचखंड हजूरसाहिब गुरुद्वारा, रणजीतसिंगने १८३७ मध्ये बांधला. गुरू गोविंदसिंग यांनी मृत्यूच्या काही दिवस अगोदर घोषित केलं होतं- माझ्यानंतर कोणीही शीख धर्मगुरूच्या गादीवर येणार नाही, गुरु मानेयो ग्रंथ (ग्रंथसाहिब हेच गुरू असतील). अशा या ग्रंथसाहिबमध्ये सर्व शीख गुरूंचीच काय, पण मुस्लीम, हरिजन, सुफी अगदी आपल्या संत नामदेवांची वचने, अभंग समाविष्ट आहेत. आणि हो, पंजाबमध्ये आजही आदराने नाव घेतल्या जाणाऱ्या या संत नामदेवांना, पंढरपूरच्या विठोबा मंदिराची मात्र आपण एकदाही पायरी चढू दिली नाही. पंढरीचे दरवाजे मागासवर्गीयांना उघडले थेट १९४७ साली, तेही साने गुरुजीसारखी विभूती, प्राणांतिक उपोषणाला बसल्यावर.

हिंदू धर्मात चारधाम यात्रेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. वानप्रस्थाश्रमात पोहोचल्यावर (आजच्या भाषेत सेवानिवृत्त झाल्यावर) चारधाम यात्रा पार पडली म्हणजे आयुष्याचं सार्थक झालं असं मानणारा मोठा वर्ग आहे. सूर्यपुत्री आणि यमाची जुळी बहीण समजल्या जाणाऱ्या यमुना नदीचे उगमस्थान असलेल्या यमुनोत्री मंदिरापासून या यात्रेचा आरंभ होतो. टेहरी गढवालचा राजा प्रतापसिंग याने सन १८४० च्या सुमारास हे मंदिर बांधलं असावं.

भगीरथाने स्वर्गातून पृथ्वीवर आणली व भगवान शंकराने जटेत धारण केली असं मानलं जाणारी ती गंगा नदी. हिंदू धर्मात अत्यंत पवित्र असणाऱ्या गंगेची प्रदूषण करून आपण काय अवस्था केली ते बघूया पुढे कधीतरी. गंगेच्या उगमस्थानाचे समुद्रसपाटीपासून अंदाजे १०००० फूट उंचावर असणारे, गंगोत्री मंदिर, नेपाळी सेनानी अमरसिंग थापा याने बांधले. आजचं पांढऱ्याशुभ्र ग्रानाईट मधलं मंदिर ही बहुतेक जयपूरच्या राजाची निर्मिती.

चारधाम यात्रेत पुढचा टप्पा येतो केदारनाथ मंदिराचा. महाभारतातील पांडवांनी मूळ  मंदिर बांधलं अशी भक्तांची भावना. अक्षय्यतृतीयेपासून काíतकी पौर्णिमेपर्यंत दर्शनासाठी खुले असणाऱ्या या मंदिराची उभारणी आठव्या शतकात आदिशंकराचार्यानी केली. ज्यांनी शृंगेरी (कर्नाटक), ज्योतीमठ (उत्तराखंड), पुरी (ओडिशा)आणि द्वारका (गुजरात) या चार धर्मपीठांची स्थापना केली त्या आदिशंकराचार्याना आईच्या निधनानंतर तत्कालीन पुरोहित वर्गाने अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला होता. शंकराचार्यानी मृतदेहाचे तीन तुकडे करून दहन केले, असं इतिहास सांगतो. सन २०१३ मध्ये उत्तराखंड येथे झालेल्या ढगफुटी आणि नंतरच्या भूस्खलनाने केदारनाथ मंदिर परिसराची अपरिमित हानी झाली. शेकडो भक्त प्राणास मुकले. प्रत्यक्षदर्शीच्या सांगण्यानुसार, मुख्य मंदिराच्या मागे एक मोठा खडक वाहत येऊन थांबला. त्यामुळे पाण्याच्या प्रवाहाची दिशा बदलली व धोका टळला. डागडुजी व पुनर्वसनासाठी एक वर्ष बंद असलेल्या या मंदिराची पुरातत्त्व विभाग व आयआयटी मद्रास येथील तज्ज्ञांनी अविद्ध्वंसक (नॉन डिस्ट्रक्टिव्ह) तपासणी करून मंदिरास कसलाही धोका नसल्याचा निर्वाळा दिला आहे.

बद्रीनाथ दर्शन म्हणजे चारधाम यात्रा सफल झाली असा भक्तांचा विश्वास. आदिशंकराचार्यानीच उभारलेले विष्णूचे मंदिर भूकंप आणि कडे कोसळण्याने अनेकदा नष्ट होऊन परत बांधण्यात आले. केदारनाथप्रमाणे वर्षांतून सहा महिनेच दर्शनास खुले असलेले हे मंदिर, आजच्या जागेवर सोळाव्या शतकात गढवालच्या राजाने बांधले. चार धाममध्ये सर्वात भव्य आणि देखणे असणाऱ्या या मंदिराच्या बांधकामावर, बौद्ध आíकटेक्चर व रंगसंगतीचा मोठा प्रभाव आहे. महाभारतानंतर पांडवांनी येथूनच स्वर्गारोहण केलं असा भाविकांचा समजं. म्हणूनच बहुतेक चारधाम सांगता इथे करण्याची प्रथा पडली असेल.

बारा ज्योतिìलगात अत्यंत महत्त्वाचे मंदिर काशी येथील विश्वनाथाचे. गंगा किनाऱ्यावरील या मंदिरातील, विश्वनाथाच्या दर्शनाने सर्व पापक्षालन होऊन, जन्म-मरणाच्या फेऱ्यातून मुक्ती मिळून थेट मोक्षप्राप्ती होते असं हिंदू धर्मीय मानतात. सन ११९४ पासून अनेकदा हे मंदिर पाडण्यात व पुन्हा बांधण्यात आले. त्यातील एकदा उभारणी सम्राट अकबराच्या नावावर तर या मंदिराचा शेवटचा विद्ध्वंस औरंगजेबाने केला. साल १६६९. औरंगजेबाने त्या जागेवर ज्ञानवापी मशिद बांधली. पुढे मोगलांचं साम्राज्य उतरणीला लागल्यावर हालचाली सुरू झाल्या, मशीद पाडून मंदिर बांधण्याच्या. अर्थात प्रचंड विरोधही झाला. समजूतदारपणा दाखवून अहिल्याबाई होळकर यांनी शेजारील जमीन विकत घेऊन १७८० मध्ये पुन्हा मंदिराची उभारणी केली. आयुष्यभर जिथे वास्तव्य असेल, तिथला कोणीही उपाशी नाही याची खात्री करून मगच दिवसातून एकदाच जेवणाऱ्या, या अहिल्यादेवींनी भारतभर केलेल्या बांधकामांची माहिती द्यायची झाली, तर अनेक लेख लिहावे लागतील. विश्वनाथ मंदिराला  सोन्याचा पत्रा महाराजा रणजीतसिंग यांनीच दिला.

रावण हा ब्राह्मण. ब्रह्महत्येचं प्रायश्चित्त करण्यासाठी क्षत्रिय रामाने शिवपूजा आरंभली. हनुमानाला शिविलग आणण्यास उशीर लागल्याने सीतेने वाळूचे शिविलग बनविले. ते ठिकाण रामेश्वर अशी रामायणात कथा आहे. रामेश्वरम् मंदिर बांधण्यास बाराव्या शतकात पंडय़ा राजवटीत सुरुवात झाली असावी तर अठराव्या शतकाच्या अखेरीस सेतुपती राजवटीत सांगता. सिलोनमधील जाफनाच्या राजांचा या मंदिराच्या उभारणीत मोठा वाटा आहे.  बाराशेहून जास्त कोरीव दगडी खांबांवर तोललेला बाहेरचा प्रदक्षिणा मार्ग  (कॉरिडॉर) हा भारतातील हिंदू देवळात सर्वात जास्त लांब व भव्य म्हणून प्रसिद्ध आहे. बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असलेल्या जवळपास १७० फूट (अंदाजे १७ मजले) उंचीच्या या मंदिराला अनेकदा वादळाचे, सुनामीचे तडाखे बसले, जवळचा भूभाग समुद्रार्पण झाला (भूगोलात शिकलेलं, भारताच्या दक्षिणेचं शेवटचं रेल्वे स्टेशन – धनुष्कोडी आठवतंय? आज ते समुद्राच्या पोटात आहे.) पण मंदिराची फारशी पडझड झाली नाही.

बहुतेक इतिहासकारांच्या मते, मोहंमद पगंबर यांच्यापासून मुस्लीम धर्माला सुरुवात झाली. (अर्थात याच्या विरोधात अनेक मतप्रवाह आहेत. अशीच मतमतांतरे जैन धर्म, वर्धमान महावीर यांच्यापासून सुरू झाला की आधीपासून अस्तित्वात होता यावरही आहेत.) सौदी अरेबिया मधील काबा मशीद (मशीद अल हरम) जगातील सर्वात जुनी (सन ६२२ च्या सुमारास?) व सर्वात मोठी मशीद. ही मशीद अनेकदा पाडली व परत बांधली गेली. मोहंमद पगंबर यांनी स्वत: या मशीदीच्या बांधकामात हातभार लावला, असे दाखले आहेत. अंदाजे पंचवीस लाख भाविक सामावतील एवढा या मशिदीचा विस्तार आहे. सन २०१६ पर्यंत या मशिदीच्या नूतनीकरणासाठी शंभर  बिलिअन डॉलर (सर्वसाधारण ६,५०,००० कोटी रुपये) खर्च झाला असावा. अत्यंत पवित्र समजली जाणारी हज यात्रा आयुष्यात घडावी अशी प्रत्येक मुस्लिमाची धारणा असते.

भारतात पहिली मशीद केरळमधील त्रिसूर येथील चेरमान जुम्मा मशीद, बांधकाम सन ६२९ मध्ये. आजही अस्तित्वात असलेली. इतकंच काय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१६ च्या सौदी अरेबिया दौऱ्यात, या मशिदीची सोन्याचा पत्रा लावलेली प्रतिकृती सुलतानाला भेट म्हणून दिली.

शहाजहानने १६५६ मध्ये दिल्लीला लाल सँड स्टोन व पांढऱ्या संगमरवरात बांधलेली जहान नुमा (जामा) मशीद. चंद्र दिसल्याच्या या मशिदीच्या फतव्यावर भारतातील बहुतेक मुस्लीम, रमजानची सुरुवात करतात. जवळपास ५००० कामगारांनी १२ वष्रे काम करून पूर्णत्वास नेलेल्या, त्या काळातील दहा लाख रुपये खर्च आलेल्या या मशिदीचे उद्घाटन, बुखारा (आजचे उझबेकिस्तान) येथील इमामांनी केले होते. आग्रा येथील शहाजहानने बांधलेली जामा मशीद व लाहोर येथे औरंगजेबने बांधलेली बादशाही मशीद या बऱ्याचशा जामा मशिदीशी, बांधकामात साधम्र्य असलेल्या.

गाजलेला अर्थशास्त्रज्ञ केन्सच्या सिद्धांतानुसार, सरकारने रोजगार निर्मिती करताना अनुत्पादक कामे केली तरी चालतील. उदाहरणार्थ आज खड्डे खोदणे व उद्या तेच परत भरणे. अवधचा नवाब असफउददौला याने राज्यात भयानक दुष्काळ पडला असताना जनतेला रोजगार मिळावा म्हणून दिवसा बांधकाम करणे आणि रात्री काही भाग  पाडणे अशा पद्धतीने एक मशीद उभारली.(केन्स सन १८८३ तर नवाब १७८५). आज आपण भारतातील सर्वात मोठी, लखनौची बडा इमामबारा मशीद म्हणून तिला ओळखतो. मधला घुमट ५० मी. लांब, १६ मी. रुंद व १५ मी. उंच इतका भव्य असलेल्या या बांधकामात कुठेही लोखंडाचा वापर केलेला नाही (आज लोखंड वापरायचे नाही म्हटले तर अनेक अभियंते कामाला नाही म्हणतील).

अरे हो, अंदाजे तीन लाख भाविक सामावतील एवढय़ा मशिदीच्या कामासाठी, त्या काळी आíकटेक्ट नेमण्याची स्पर्धा घेण्यात आली होती. दिल्लीतील आíकटेक्ट, किफायतुल्ला याने स्पर्धा जिंकून काम मिळविले. त्याची आणि नवाब असफ या दोघांची कबर या मशिदीत आहे.

हैदराबादची मक्का मशीददेखील जुनी १६९४ मधली व मक्काहून आणलेली माती व विटा वापरून बांधलेली. अनेक चित्रपटांत दिसलेला, मुंबईचा प्रसिद्ध हाजी अली दर्गा १४३१ मधला. समुद्राच्या ओहोटीच्या वेळीच आत जाता येत असूनही, हजारो भाविक दग्र्याला भेट देतात.

याहून जुनी नवी मंदिरे, चच्रेस, मशिदी जगभर अस्तित्वात आहेत. सर्वाचा इथे उल्लेख केवळ अशक्य. जगातील सर्वात जुने मंदिर तुर्कस्तानात उरफाजवळ, गोबेकली टेपे येथे आहे. ते साधारण ११००० वर्षांपूर्वीचे असल्याचा पुरातत्त्व शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. बिहारमधील भबूआ येथले मुंडेश्वरीदेवीचे देऊळ बांधकाम अंदाजे इ. स. १५० ते ३५० मध्ये झालेलं. हे बहुतेक भारतातील सर्वात पुरातन, अजून पूजाअर्चा होत असलेले मंदिर असावं, असा बिहार सरकारचा दावा आहे.

देव आहे की नाहीपासून देवाला रिटायर्ड करा इथपर्यंत अनेक वादविवाद जगभर होतात आणि उद्याही होतील. नाही तरी चच्रेतून, विचारमंथनातून, सर्वाना समजून आणि  सामावून घेतच संस्कृती पुढे जात असते.

khandeshe.abhay@gmail.com