मालमत्तांचे दर गगनाला भिडत असताना आणि मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणी मोकळी जागा व उद्याने यासाठी अतिशय कमी जागा किंवा जागाच उपलब्ध नसताना, ग्राहकांना त्यांच्या मुलांसाठी आदर्श जागा शोधणे अवघड वाटते.

बालपण हा जीवनातील एक अत्यंत सुंदर टप्पा आहे. सुरुवातीची वाढीची वर्षे ही मुलांच्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत महत्त्वाची ठरतात. आनंदी आणि समाधानी बालपण उत्तम वातावरणातून येते. सुरुवातीच्या वर्षांतील बराचसा काळ मुले घरामध्ये घालवतात आणि शाळेत अगदी कमी तास घालवतात. त्यामुळे त्यांच्या वाढीला आणि भावनिक विश्वासाला अनुकूल ठरेल, असे वातावरण त्यांना देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आज बहुतांश शहरांचे रूपांतर सिमेंटच्या जंगलांमध्ये होत आहे. मुलांना फक्त खेळण्यासाठी किंवा धावण्यासाठी अगदी कमी जागा असते किंवा जागाच उरलेली नाही.
आपल्यापैकी अनेक जण आज ऑफिसचे काम आणि जीवन यांच्या संतुलनाबद्दल बोलतो, पण संतुलित घरांबद्दल फार कमी लोक बोलतात. घरांच्या बाबतीत विचार करता, आज ज्या प्रकारे घरे बांधली जातात त्यामध्ये कितीही मर्यादा असल्या तरी, प्रत्येक गोष्टंसाठी जागा उपलब्ध असेल आणि प्रत्येकासाठी खोली उपलब्ध असेल, अशा प्रकारे घरांची निर्मिती करायला हवी.
रिअल इस्टेटमधील गुंतवणूक ही एखाद्याच्या जीवनातील सर्वात मोठी गुंतवणूक असते आणि बहुतांश लोक दीर्घकाळ एकाच घरामध्ये वास्तव्य करतात. त्यामुळे घरामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य विचार घेणे आणि योग्य गोष्टी ध्यानात घेणे अतिशय गरजेचे आहे. तसेच, मुलांच्या बाबतीत
विचार करता, पालकांनी त्यांच्या मुलांच्या वाढीच्या वर्षांतील विविध टप्प्यांचा विचार करणे अत्यावश्यक आहे. वाढीच्या सुरुवातीच्या काळात केवळ धावण्यासाठी, सायकल चालवण्यासाठी, खेळण्यासाठी मुलांना मोकळ्या आणि हरित जागेची गरज असते. त्यांच्या मध्यम वयामध्ये पोहणे, स्केटिंग, बॅडमिंटन आणि त्यांच्या आवडीचे विविध खेळ खेळता येतील अशी जागा त्यांना मिळणे महत्त्वाचे ठरते. आजची किशोरवयीन मुले आरोग्याच्या बाबतीत जागरूक असतात आणि त्यामुळेच व्यायामशाळेची व कॅफे, क्लब हाऊस अशा अन्य कम्युनिटी सेंटरची गरज निर्माण होते, जेणेकरून तेथे त्यांना मित्रांसोबत वेळ घालवता येतो. काही मुलांना कला, नृत्य व संगीत यामध्ये रस असतो आणि ग्राहकांच्या जीवनप्रवासातील या पैलूंचा विचार करणाऱ्या घरांची निर्मिती करणे उपयुक्त ठरेल.

रिअल इस्टेटमधील गुंतवणूक ही एखाद्याच्या जीवनातील सर्वात मोठी गुंतवणूक असते आणि बहुतांश लोक दीर्घकाळ एकाच घरामध्ये वास्तव्य करतात. त्यामुळे घरामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य विचार घेणे आणि योग्य गोष्टी ध्यानात घेणे अतिशय गरजेचे आहे. तसेच, मुलांच्या बाबतीत विचार करता, पालकांनी त्यांच्या मुलांच्या वाढीच्या वर्षांतील विविध टप्प्यांचा विचार करणे अत्यावश्यक आहे.

मालमत्तांचे दर गगनाला भिडत असताना आणि मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणी मोकळी जागा व उद्याने यासाठी अतिशय कमी जागा किंवा जागाच उपलब्ध नसताना, ग्राहकांना त्यांच्या मुलांसाठी आदर्श जागा शोधणे अवघड वाटते. ग्राहकांच्या दृष्टीने योग्य निर्णय हा आहे की, त्यांनी मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये शोध घ्यावा, जेथे मोठे भूखंड विकसित करण्यासाठी मुबलक जागा असेल. ग्राहकांना त्यांच्या जीवनशैलीविषयक गरजा पूर्ण करणारे, तसेच त्यांच्या मुलांना पोषक वातावरण देणारे घर शोधण्यासाठी घोडबंदर रोड-ठाणे, बदलापूर, पनवेल कल्याण या ठिकाणांचा विचार करता येईल.
एकेकाळी मुंबईपासून लांबचे शहर म्हटले जाणारे ठाणे आज स्वयंपूर्ण महानगरामध्ये रूपांतरित झाले आहे. अनेक मॉल, हॉटेल, खाद्यपदार्थाची ठिकाणे व अन्य सुविधा असलेला घोडबंदर रोड मुंबईशी जोडलेल्या अन्य ठिकाणांपेक्षा अधिकाधिक सुविधा देत आहे, तसेच चांगली जीवनशैली व पायाभूत सुविधा देत आहे. प्रतिष्ठित अद्ययावत शैक्षणिक संस्थांपासून ते येऊर टेकडय़ा व उल्हास नदीच्या सुंदर परिसरापर्यंत, तसेच मुलांसाठी असलेल्या भरपूर मोकळ्या जागेपर्यंत, प्रत्येक बाब तुमच्या मुलांना आनंदी आणि निरोगी बालपणाची खात्री देईल.