रानभाज्यांच्या दुर्लभ प्रकारांना आता त्या घरात वाढवणं सहज शक्य आहे. हे सर्व भाज्यांचे प्रकार आपल्या घरी वाढविण्याच्या/ लावण्याच्या पद्धतींविषयी..

निसर्गदेवतेच्या हिरव्याकंच शालूला वर्षांऋतूत रत्नवैभवाची जणू झालरच लागते. रानभाज्या, रानकंद अन् रानफळं हीच ती निसर्गरत्नं होत. शेतीच्या कामापासून थोडी उसंत मिळाल्यावर कुठेतरी शहरात रस्त्याच्या कडेला, वळचणीत वा बंद गाळ्यासमोर बसून या दुर्लभ रानमेव्याची विक्रीचा थाट मांडला जातो. उत्सुक गृहिणी अनोख्या पर्णगुच्छांची माहिती घेत, कृती विचारून स्वस्तात खरेदी करतात. कारण या अमूल्य मेव्याची महती त्यांना शहरी भाषेत समजावणं शक्य नसतं व भ्रांत असते ती सायंकाळी घरची चूल पेटण्याची. आता मात्र खवय्याना चोरपावलांनी या जंगलमेव्याच्या खजिन्याचा शोध घेण्याची गरज भासणार नाही. कारण हा रानमेवा आता चक्क बाल्कनीतच अवतरेल. तसं तंत्रही विकसित होतंय. थोडीशी जिज्ञासा, चिकाटी व मेहनत असणाऱ्या गृहिणींना या जवळजवळ सर्व रानभाज्या वर्षभर स्वत:च्या बाल्कनी, टेरेस वा बंगल्याच्या आसपास लावणं सहज शक्य आहे. व्हर्टिकल गार्डनमध्येसुद्धा केवळ दिखाऊ म्हणून निरुपयोगी, क्वचित विषारीही अशी विदेशी झाडं लावण्यापेक्षा शहरी लोकांना हा पर्याय उत्तम वाटू लागतोय. अशा जागी शोभेच्या झाडांऐवजी उपयुक्त अशा रानभाज्या, रानवेली, रानकंद,  इ. लावले जातायत. ही झाडं देखणी तर आहेतच, पण त्यांची उपयुक्तताही खूप आहे, आरोग्यासाठी व त्यांच्या चविष्टपणामुळेसुद्धा.

Why are naphthalene balls kept with clothes to be put away How do you use naphthalene balls in a wardrobe
कपड्यांमधील ओलसरपणा, कुबट वास होईल गायब; कपाटात ठेवा ‘ही’ गोळी, जाणून घ्या वापराची योग्य पद्धत
Big falls in Sensex and Nifty
सेन्सेक्स अन् निफ्टीत मोठ्या प्रमाणात पडझड; शेअर बाजाराच्या घसरणीला ‘या’ तीन गोष्टी ठरल्या कारणीभूत
chandrachud (1)
“लैंगिक भेदभाव संपवा, स्त्रियाही खोल समुद्रात जाऊ शकतात”, कोस्ट गार्डप्रकरणी सुप्रिम कोर्टाने केंद्राला फटकारले
Use Apps to Manage Electricity Use and Reduce Bills During Summer Heatwaves
भरमसाठ वीज देयक येते का? ‘हे’ करा मग येईल वीज वापराचा अंदाज…

पारंपरिक ज्ञान व लोकसंग्रहातील अनुभवजन्य माहितीवर आधारित या रानमेव्याचे गुण व वैशिष्टय़ांची माहिती ही चांगलीच पसरू लागलीय व याचं श्रेष्ठत्वही पटू लागलंय. पचनविकार दूर करणारी विचरीची भाजी, आतडय़ाची गती (cysiolic movement) सुधारून मुळव्याधीपासून बचाव करणारी केणी, घोळ, चिवी व कवळी हरितद्रव्य भरपूर असलेली, रोगप्रतिकारशक्ती वाढविणारी बापली, मूत्रविकारग्रस्तांसाठी कुर्डू (पानं व बियासुद्धा), अस्थिभंगावर फायदेशीर वज्रलता, रक्तशुद्धीकारक व त्वचाविकारनाशक उग्र टाकळा, त्याच्या बलकारक बिया, मधुमेही/प्रमेही लोकांना उपकारक करटोळी (कंटोळी), पंडुरोग्यांसाठी गोवल, मज्जातंतूंना बळकटी आणणारी सुवर्णतत्त्वयुक्त कोरल, याशिवाय तेलपट, खुरासनी, फोडशी, शेवळी, गाबोळी, खोकली, कारिवणा, अबय, आघाडा, कांचन व हादग्याची फुलं, भारंगी व भांगरा, याशिवाय घोमेटी, ससेकंद, कांदफळे, भुरमुळे, करांदे, कणगं.. अगणित अशा शुद्ध, स्वस्त, नैसर्गिक, खरोखरीच्या सेंद्रीय व पूर्णपणे निर्धोक अशा भरपूर पोषकतत्त्वे व ३० पेक्षा जास्त सूक्ष्म घटकांची पूर्तता करणारे खनिजं, जीवनसत्त्व व प्रथिनांचा अमर्याद खजिनाच जणू! या सर्व अँटिऑक्सिडंट, रोगप्रतिरोध क्षमता वाढविणाऱ्या, ऊर्जेचा स्रोत अशा अद्भुत गुणांनी युक्त, पण कोलेस्ट्रॉल वा स्निग्ध पदार्थ नसणाऱ्या अशा आहेत. शरीरातील (Toxins) विषद्रव्यं व रक्तातील अनावश्यक घटक बाहेर फेकणं अपायकारक सूक्ष्म जंतूंशी सामना करणं व त्यांना निष्प्रभ करणं यासाठी निसर्गानं त्यांची योजना केलीय. या सर्व जंगलातल्या दुर्लभ प्रकारांना आता माणसाळवून घरात वाढवणं सहज शक्य आहे. हे सर्व भाज्यांचे प्रकार आपल्या घरी वाढविण्याच्या/ लावण्याच्या दोन पद्धती आहेत. पहिली पद्धत अतिशय सोपी, साधी अशी असून त्यात फक्त घरी असलेल्या कुंडय़ातील झाडांच्या अवतीभवती असलेल्या मोकळ्या जागेतील माती उकरून त्यात कंपोस्टयुक्त माती मिसळून रानभाज्यांचे बी पेरणे वा कंद वा वेली लावणे ही होय. गाबोळी, घोमेटी, अबय, कंटोली हे वेलप्रकार व कुर्डू, विचरी, कवली वा माका या भाज्या अशा पद्धतीनं वाढवणं सहज शक्य होतं. वेल प्रकारांना कुंडीतल्या मुख्य झाडावर वा बाल्कनीतील ग्रीलवरती (उन्हात अति गरम होत नसल्यास) वा थोडाफार आधार देऊन लावता येते. स्वतंत्र लागवड नसल्यानं या पद्धतीनं भाज्यांची अपेक्षित वा जोमदार वाढ होत नाही.

थोडीशी जिज्ञासा, चिकाटी व मेहनत असणाऱ्या गृहिणींना या जवळजवळ सर्व रानभाज्या वर्षभर स्वत:च्या बाल्कनी, टेरेस वा बंगल्याच्या आसपास लावणं सहज शक्य आहे. व्हर्टिकल गार्डनमध्येसुद्धा केवळ दिखाऊ म्हणून निरुपयोगी, क्वचित विषारीही अशी विदेशी झाडं लावण्यापेक्षा शहरी लोकांना हा पर्याय उत्तम वाटू लागतोय. अशा जागी शोभेच्या झाडांऐवजी उपयुक्त अशा रानभाज्या, रानवेली, रानकंद,  इ. लावले जातायत. ही झाडं देखणी तर आहेतच, पण त्यांची उपयुक्तताही खूप आहे, आरोग्यासाठी व त्यांच्या चविष्टपणामुळेसुद्धा.

दुसऱ्या पद्धतीनुसार या भाज्या कुंडय़ात, खोक्यात (प्लॅस्टिक/ लाकडी/ सीमेंट) स्वतंत्रपणे वाढविता येतात. या पद्धतीनुसार लागवड करण्यासाठी थोडीफार अधिक मेहनत घ्यावी लागते. पण अशा पद्धतीनं हे भाजी प्रकार खूप जोमाने वाढतात व जवळजवळ वर्षभर पुरतात. यासाठी प्रथम बसक्या म्हणजे साडेतीन ते पाच इंच उंचीच्या व आकाराने गोल, लंबगोल, चौकोनी व आयताकृती अशा (शक्यतो मातीच्या) कुंडय़ा उपलब्धतेनुसार निवडाव्यात. कुंडय़ांच्या तळातील छिद्रांवर ((Drain Hole) खापरी वा करवंटीचे तुकडे पालथे बसवून त्यावर विटांचे १०-१२ बारीक केलेले तुकडे टाकावेत. मुरलेले शेणखत, कम्पोस्ट, गांडूळ खत, रेती मिश्रित माती थोडीशी, कडुलिंब वा निर्गुडीची पानं मिसळून टाकावी. त्यानंतर खतमाती सुपर सॉइल वा भाताचे तूस मिसळून कुंडीच्या तीन चतुर्थाश भागापेक्षा थोडय़ाशा वरच्या पातळीपर्यंत भरावी या मातीत उपलब्ध असल्यास पालेभाजीची रोपं वा देठ लावावे. किंवा बी असल्यास काही मुळासकट मिळणाऱ्या रानभाज्यांच्या वरचा भाग कापून घेऊन उरलेला भाग लावावा. पाणी घालून अशा कुंडय़ा ६/७ दिवस सावली वा कमी उन्हं असलेल्या भागात ठेवाव्यात. बी वा मुळासकट रोपं मिळत नसल्यास उपलब्ध भाजीच्या जून काडय़ा थोडंसं Rooting Horimone च्या द्रावणात बुडवून लावणे हाही पर्याय आहे. पाणी दररोज पहाटे वा सायंकाळी झारी वा स्प्रिंकलरनेच द्यावे. यामुळे मातीची अनावश्यक धूप पाण्यामुळे होणार नाही व शहरी भागातील हवेत असलेले धुलिकण व कार्बन इ. पानांवरून जाऊन रोप चमकदार दिसतील. पूर्णपणे सेंद्रिय खतांचा हात दर पंधरा दिवस वा महिन्यातून एकदा गरजेनुसार द्यावा. सेंद्रीय वनस्पतीजन्य, कीटकनाशकं उदा. कडुलिंब वा करंजतेल, गोमुत्र, राख वा क्वचित तंबाखूच्या पानांचे पाणी, इ.चा वापर करावा. रासायनिक, घातक विषारी कीटकनाशकांचा वापर टाळावा म्हणजे या भाज्या विषमुक्त होऊन सेवनासाठी अत्यंत सुरक्षित होतील. अशा प्रकारे लावलेल्या भाज्या खुडणे कापणे आवश्यकतेनुसार करताना काही रोपे पूर्ण वाढू द्यावीत व त्यापासून बी मिळवावे म्हणजे त्याची पुनर्लागवड करणे शक्य होईल. त्यातूनही क्वचित बुरशी, सूक्ष्मजंतू व व्हायरस यांच्यामुळे होणारे करपा, तांबेरा, टिका, काजळी, मावा, तुडतुडे, तपाकेरी, ढेकण्या वा लष्करी अळी, इ. च्या प्रादुर्भावापासून दूर ठेवण्यासाठी बागकाम वा शेतीतंत्राचा सल्ला घेऊन रोगनियंत्रक प्रतिबंध, जल व खत व्यवस्थापन करावे. पिकांचा फेरपालट म्हणजे भाज्यांच्या लागवडीत बदल करावेत. शक्यतो आपल्या परिसरात वा आसपासच्या जंगलात होणाऱ्या स्थानिक भाज्यांचे प्रकार घरी उगवले तर हवामान व मातीचा प्रकार व पोत तेच राहिल्यामुळे या भाज्या नीट वाढतात. परराज्यातून आणलेल्या बऱ्याचशा भाज्यांचे प्रकार नीट वाढताना दिसत नाही असे  तज्ज्ञांचे मत आहे.

जेनेटिकली मॉडिफाइड व संकरित वा बियाणी व विकसित वाणांच्या गर्दीत आपण आपलं हे धन व मूळ स्वरूप हरवून बसतो की काय अशी भीती वाटते. औद्योगिकीकरणाच्या रेटय़ात व विकासाच्या आभासात नामशेष होत जाणाऱ्या या निसर्गाच्या अद्भुत आविष्काराला सोनेरी कडाही आहे. वर्धा इथल्या कुमारप्पमपूरमधलं केंद्र सरकारचं Centre & Science for Villages मध्ये अशा अनेक नैसर्गिक गोष्टींवर शास्त्रशुद्ध संशोधन सुरू असून या रानमेव्याला लोकप्रियता, राजमान्यता व व्यापारी तत्त्वावर प्रचार व प्रसार करण्याचे अथक प्रयत्न सुरू झालेत. निसर्गविज्ञान व पर्यावरणप्रेमींनी अशा मोहिमा व जागृती आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणंही आवश्यक आहे, तरच अशा उपयुक्त गोष्टींवरचा दुर्लभतेचा शिक्का पुसला जाईल. त्यामुळे निसर्गाच्या नियोजनबद्धतेचा अविभाज्य घटक असलेले सण, व्रतवैकल्ये व त्याच काळात उपलब्ध होणारे रानकंद, मुळं, वनस्पती, फळं व त्याच्या विविध पाककृती हे सर्व टिकून राहील. तशी गरज आहे. कारण हे नेत्रसुखद, आल्हाददायी, आरोग्यकारक, निसर्गस्नेही व पर्यावरणपोषक जैवविविधतेचे अंग आहे. गरज आहे ती फक्त सुबत्ता व स्वास्थ्य याकडे नेणाऱ्या आडवळणाच्या या चिंचोळ्या, मळक्या पायवाटेकडे पाहण्याची मानसिकता रुंदावण्याची!

डॉ. उदयकुमार पाध्ये – cosmicecologicaltrust@gmail.com